AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुःखद बातमी! भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

Datta Meghe Passes Away : भाजपचे ज्येष्ठ नेत, माजी मंत्री, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेव दत्ता मेघे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी नागपूर येथे अखेरचा श्वास घेतला.

दुःखद बातमी! भाजपचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन
Datta MegheImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 22, 2026 | 10:20 PM
Share

राज्याच्या राजकारणातून दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेत, माजी मंत्री, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेव दत्ता मेघे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी नागपूर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मेघे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपसाठी काम केले. त्यांनी लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच ते महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेचेही सदस्य होते.

राजकीय कारकीर्द

दत्ता मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. मेघे यांनी आपल्या सौम्य, मृदूभाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. कारकीर्दीची सुरुवात त्यांनी काँग्रेस पक्षात केली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सध्या भाजपचे सदस्य होते. त्यांनी अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषविली. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले तसेच त्यांनी रुग्णालयांचेही मोठे साम्राज्य उभे केले आहे.

नितीन गडकरी यांची भावूक पोस्ट

दत्ता मेघे यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, ‘ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही.

विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंत आदिवासी भागात दत्ताभाऊंनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली.

माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढेही वैचारिक विरोधक असूनही दत्ताभाऊंनी कायम मला प्रेम-जिव्हाळा दिला व मार्गदर्शन केले. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले. प्रकृती अस्वास्थ्य असूनही विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे सर्वसमावेशी नेतृत्व राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या परिवारास व सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.

दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

दत्ता मेघे यांच्या निधनावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले की, ‘दत्ताजी मेघे यांनी विदर्भाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे खुली झाली. एक अनुभवी संसदपटू आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दिग्गज नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?