vidarbha rain update | विदर्भात बहुतांंश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, रब्बी पिकांना मोठा फटका

| Updated on: Feb 18, 2021 | 11:33 PM

गहू,चना, वाटाणा, लाखोरी, तूर या पिकांच्या बरोबरीने भाजीपाला यांनासुद्धा या पावसाचा मोठा फटका बसला आहे.  (vidarbha rain update farmers care tips)

vidarbha rain update | विदर्भात बहुतांंश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, रब्बी पिकांना मोठा फटका
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : राज्यात 16 ते 18 फेब्रवारी या काळात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. या अंदाजानुसार विदर्भातील (vidarbha) बहुतांश जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. विशेष म्हणजे गहू,चना, वाटाणा, लाखोरी, तूर या पिकांच्या बरोबरीने भाजीपाला यांनासुद्धा या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कोरोना आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाला येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.  (vidarbha rain update in all district rain with wind tips for farmers what care has to be taken)

इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस तसेच हवामान खात्याच्या पुणे विभागाने राज्यात 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडला आहे .

पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या भागांत कमी प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही असे हवामान खात्याने सांगितले होते. त्याप्रमाणे येथील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडला आहे.

गोंदिया :

गोंदीया जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात 17 जानेवारी रोजी रात्री अडीज वाजता गारांचा पाऊस पडला. जोराच्या पावसामुळे या भागातील गहू, चना, वाटाणा, लाखोरी, तूर या पिकांचे तसेच भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 18 फेब्रुवारी रोजीसुद्धा गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस पडला.

वर्धा :

वर्धा जिल्ह्यामध्ये 17 जानेवारीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या वर्धा, देवळी, हिंगणघाट, सेलू तालुक्यासह कारंजा तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर पाऊस पडला.

वाशिम :

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासून मालेगाव तालुक्यातील राजुरा, राजकीन्ही, अमानवाडी या परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. वाशिम जिल्ह्यात कारंजा, मंगरुळपिर, मालेगाव तालुक्यातील काही गावामध्ये पाऊस तसेच गारपिटीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा पिकांचं नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अमरावती :

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावतीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात पश्चिम विदर्भात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. अमरावतीमध्ये गहू, हरभरा, तूर पिकाचं नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्बात 19 तारखेला काही प्रमाणात हवामान ढगाळ राहील. त्यानंतर 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या काळात शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणीसाठी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, टिनच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजवळ आसरा घेऊ नये, असे आवाहन शेतकरी तसेच नागरिकांना करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Pune Weather : पुणेकरांसाठी हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता