Video : पुणे महापालिकेच्या मुद्रणालयात दारु पार्टी! सुरक्षा रक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग?

| Updated on: Sep 27, 2021 | 6:14 PM

पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचं मामाराव दाते मुद्रणालय आहे. या मुद्रणालयात सुरक्षा रक्षकच पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत दारु पार्टी करत अशल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आलाय.

Video : पुणे महापालिकेच्या मुद्रणालयात दारु पार्टी! सुरक्षा रक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग?
पुणे महापालिकेच्या मुद्रणालयात दारु पार्टी
Follow us on

पुणे : पुण्यातील मामाराव दाते मुद्रणालयात दारु पार्ट रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचं मामाराव दाते मुद्रणालय आहे. या मुद्रणालयात सुरक्षा रक्षकच पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत दारु पार्टी करत अशल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आलाय. महत्वाची बाब म्हणजे या दारु पार्टीत सुरक्षा रक्षकांसह सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Liquor party of security guards at Mamarao Date Press of Pune Municipal Corporation)

इतकंच नाही तर सांस्कृतिक भवनातील काही वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य पुणेकरांकडून करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हमजे अतिक्रमण विभागानं कारवाई करुन आणलेले लोखंडी साहित्य मुद्रणालयाच्या शेजारी सांस्कृतिक भवनात असतं. ते साहित्य चोरण्यासाठी चोरांना मुद्रणालयातील सुरक्षा रक्षक मदत करत असतात अशी धक्कादायक माहितीही समोर आलीय.

सुरक्षा रक्षक ओंकार गुरुड हे गुरुवारी पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी इथं रात्रपाळीत सुरक्षा बजावत असताना सांस्कृतिक भवनातील हातगाडी, पाणीपुरी गाडी चोरुन नेताना त्या चोराला पकडताना प्राणघातक हल्ला झाला होता. त्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

उद्धव ठाकरे म्हणाले, नंतर कॅप्टनला मैदान साफ करायला जावं लागतं, कनेक्शन काय?

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

Liquor party of security guards at Mamarao Date Press of Pune Municipal Corporation