AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

मागील वर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी कांग्रेसच्या बड्या नेत्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे झाले. आजही मेळावे घेतले जात आहेत, याबाबत आपण पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल
पंकजा मुंडे, भाजप नेत्या
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 4:27 PM
Share

बीड : भाजपच्या राष्ट्रीय महासचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. मागील वर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी कांग्रेसच्या बड्या नेत्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे झाले. आजही मेळावे घेतले जात आहेत, याबाबत आपण पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde question on the program of NCP leaders)

परळीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आलीय. त्याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा अहंकार असल्याचं पंकजा म्हणाल्या. इतकच नाही तर मी आता पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्या कार्यालयावरही गुन्हे दाखल झाले. त्याच दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम, दिवाळी फराळाचे कार्यक्रम झाले. आता मेळावे घेतले जात आहेत, त्याबाबत तुम्ही काय करणार? असा सवाल आपण एसपींना विचारणार असल्याचं पकंजा म्हणाल्या.

लोक आर्थिक अडचणीत आणि यांचं काय सुरु?

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. मोठाले केक कापले गेले. कोरोना अद्यापही गेलेला नाही. लोक आर्थिक अडचणीत आहेत आणि यांचं काय सुरु आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी नाव न घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय. सत्ता असो की नसो दुरुपयोग करणं हेच त्यांना कळतं, असा टोलाही पंकजा यांनी लगावला आहे.

खासदार प्रीतम मुंडेंचा टोला

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यावेळी बोलताना तत्कालीन फडणवीस सरकारनं केवळ घोषणा केली. मात्र, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत, असं वक्तव्य बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी जोरदार टोला लगावला होता.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा प्रीतम मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते. हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनीही हसायला हवं होतं, असा टोमणा प्रीतम मुंडे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भाजपकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता.

इतर बातम्या :

‘3 सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा’, मनसे नेत्याचं मोठं विधान

‘शरद पवार, उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिली की हिम्मत असेल तर रोखून दाखवा’, सोमय्यांचं थेट आव्हान

Pankaja Munde question on the program of NCP leaders

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.