AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti Candidate List : महायुतीचं टेन्शन वाढलं, तब्बल 8 जागांवर बंडखोरीचा धोका; कुठं कुठं कोणाचा अर्ज?

महायुतीत बंडखोरीचे प्रमाण जास्त असल्याने आता या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी तसेच त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. छत्रपती संभाजनगर, रायगड या मतदारसंघांतही अशीच स्थिती आहे.

Mahayuti Candidate List : महायुतीचं टेन्शन वाढलं, तब्बल 8 जागांवर बंडखोरीचा धोका; कुठं कुठं कोणाचा अर्ज?
devendra fadnavis and eknath shinde and sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2026 | 5:59 PM
Share

Vidhan Parishad Election : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची धूम आहे. अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीत बंडखोरीचे प्रमाण जास्त असल्याने आता या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी तसेच त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. छत्रपती संभाजनगर, रायगड या मतदारसंघांतही अशीच स्थिती आहे. दरम्यान, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणकोणत्या जागांसाठी बंडखोरी झालेली आहे, ते जाणून घेऊ या…

महायुतीमध्ये कुठे कुठे बंडखोरी?

1)रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी,महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींची बंडखोरी

2)संभाजीनगर-जालना-भाजपकडून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी,आ.अब्दुल सत्तार यांचे पुत्र समिर सत्तारांची बंडखोरी

3)यवतमाळ-शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी,तर भाजपचे नितिन भुतडा, राष्ट्रवादीकडून साजिद बेग यांची बंडखोरी

4)पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी,भाजपचे प्रदिप कंद यांच्याकडून बंडखोरी

5)अमरावतीत भाजपकडून प्रविण पोटेंना उमेदवारी,शिवसेनेचे विप्लव बाजोरीयांची बंडखोरी

6)नाशिक -शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी,अपक्ष गोकूळ गिते,गणेश गितेंचा अर्ज,महाजनांचे निकटवर्तीय

7)परभणी-शिवसेनेकडून सईदा खान यांना उमेदवारी,राष्ट्रवादीकडून विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकरांची बंडखोरी

8)नांदेड-भाजपकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी,राष्ट्रवादीचे प्रविण पाटील चिखलीकरांची बंडखोरी (आमदार चिखलीकरांचा मुलगा)

9)जळगाव-भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदारी,तर शिवसेनेचे रेश्मा काळे,दिपक धांडेची बंडखोरी

महाविकास आघाडीत कुठे कुठे बंडखोरी

1)नांदेड-रामदास सुमठाणकर काँग्रेसकडून मैदानात,माधवगाव जवळकरांची बंडखोरी,नागेश अष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांची ठाकरे गटाकडून बंडखोरी

2)भंडारा गोंदिया-काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल यांना उमेदवारी,तर नरेश ईश्वरकर आणि दिलिप बनसोड यांचा अर्ज, उमेदवारी वरुन संभ्रामावस्था

3)सांगली-शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटलांचा अर्ज तर काँग्रेस संजय मेंढे आणि मयूर पाटीलांचा अर्ज

4)सोलापूर-काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकरांना उमेदवारी,शरद पवार गटाकडून वसंत नाना देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश अक्कलकोटेंची बंडखोरी

दरम्यान, महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली असली तरी बंडखोरांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 4 जून आहे. तोपर्यंत आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य तोडगा काढू, असे शिंदे म्हणाले. तसेच आम्ही ही निवडणूक एकदिलानेच लढवू, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम