विदर्भात थंडीचा कडाका, गेल्या 24 तासात तापमानात घसरण, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

विशेष म्हणजे गेल्या 24 तासात विदर्भातील तापमानात साडेतीन अंशाने घसरण झाली आहे. (Vidharbha coldest  winter season record)

विदर्भात थंडीचा कडाका, गेल्या 24 तासात तापमानात घसरण, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 8:29 AM

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान हे 12 अंश सेल्सिअसवर घसरलं आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात विदर्भातील तापमानात साडेतीन अंशाने घसरण झाली आहे. (Vidharbha coldest  winter season record)

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून येणारे वारे हे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच येत्या काही दिवसात हा पारा आणखी खाली घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या विदर्भातील सर्व शहरांचे तापमान हे 12 अंशावर घसरलं आहे. विदर्भातील यवतमाळ शहराती सर्वाधिक कमी म्हणजे 12 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ चंद्रपूर 12.2 आणि नागपूर 12.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील गारठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळनंतर अनेक भागात गारठा वाढत असून पहाटे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात पाहायला मिळते. विदर्भातील थंडीचा कडाका बघता ठिकठिकाणी नागरिक स्वेटर्स, मफलर्स आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत. (Vidharbha coldest winter season record)

संबंधित बातम्या : 

भारतीयांच्या हृदयाचा आकार 20 टक्क्यांनी लहान; संशोधनात भारतीय डॉक्टरांचा दावा

गायीच्या शेणापासून साकरल्या पणत्या आणि रांगोळी, नाशिकच्या जोडप्याची अमेरिकेपर्यंत चर्चा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.