अजितदादांच्या भेटीनंतर लातूरकडे निघालेल्या विजय घाडगे यांची वाटेतच तब्येत बिघडली, ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरू

मोठी बातमी समोर येत आहे, छावा संघटनेचे नेते विजय घाडगे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते, मात्र लातूरला जात असताना वाटेतच त्यांची तब्येत बिघडल्यानं ॲम्बुलन्समध्येच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला.

अजितदादांच्या भेटीनंतर लातूरकडे निघालेल्या विजय घाडगे यांची वाटेतच तब्येत बिघडली, ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2025 | 8:51 PM

मोठी बातमी समोर येत आहे, छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, मात्र अजित पवार यांच्या भेटीनंतर लातूरला परतत असताना वाटेतच त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यांच्यावर ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान सध्या त्यांच्यावर ॲम्बुलन्समध्ये उपचार सुरू आहेत, मात्र जर त्रास कमी झाला नाही तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला होता, या व्हिडीओनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात आली, कृषीमंत्री माणिकरावक कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

याचदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरच्या दौऱ्यावर होते. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना निवेदन दिलं, यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोरील टेबलवर पत्ते उधळले. याचदरम्यान राष्ट्रवादी आणि छावाचे कार्यकर्ते आपसात भिडले, या गोंधळामध्ये छावाचे नेते विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली, या घटनेत ते जखमी झाले होते. या प्रकरणात राष्ट्रवादीकडून सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान आज विजय घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली, या भेटीनंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येत्या मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेऊ असा शब्द अजित पवार यांनी आपल्याला दिल्याची माहिती या भेटीनंतर विजय घाडगे यांनी दिली आहे. तसेच सूरत चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटल्याचं घाडगे यांनी सांगितलं. दरम्यान या भेटीनंतर लातूरला परतत असतानाच त्यांची तब्येत बिघडली, त्यांच्यावर ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र जर त्रास कमी झाला नाही तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.