वाह! आमदार असावा तर असा, शेतकऱ्यांसाठी विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा, सगळ्यांची मनं जिकंली
सरकारने गेल्या आठवड्यातच राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यंदा पाऊसच न झाल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. यंदा पुरेसा पाऊसच न झाल्यामुळे राज्यात दुष्काळाचं संकट निर्माण झालं आहे. पावसामुळे खरीप हंगाम तर हातचा गेला. मात्र परतीचा देखील पाऊस न पडल्यामुळे आता रब्बी हंगामाची आशा देखील जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने गेल्याच आठवड्यात राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली. महाराष्ट्राच्या सुमारे 75 टक्के भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील 265 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यावर दुष्काळाचं मोठं संकट आहे. सरकारकडून दुष्काळ निवारण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मोफत अन्न-धान्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीजबिलाची सुविधा, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था, पिण्याच्या पाणीची व्यवस्था, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान अशा विविध उपाय योजना राबवण्यात येणार आहे. दरम्यान त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मी माझ्या एक वर्षांच्या आमदारकीचं मानधन दुष्काळासाठी निधी म्हणून देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मदत म्हणून आपल्या एक वर्षांचं मानधन दिलं आहे.
दरम्यान दुसरीकेड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी निधी संकलनाचं आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विटवर पोस्ट केली आहे. यंदा राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. सण साध्या पद्धतीने साजरी करा. जास्त खर्च करू नका. शेतकऱ्यांना मदत करा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा बळीराजाचा आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारचं पथक देखील महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीची पहाणी करणार आहे.
