AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीब कारवाईसाठी आणि मोठा मोकाट फिरण्यासाठी का.. विजय वडेट्टीवार यांचे थेट विधान..

विजय वडेट्टीवार यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. पार्थ पवार प्रकरणात त्यांनी भाष्य केले. हेच नाही तर त्यांनी पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा, असे स्पष्ट म्हटले. पुण्यातील आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले.

गरीब कारवाईसाठी आणि मोठा मोकाट फिरण्यासाठी का.. विजय वडेट्टीवार यांचे थेट विधान..
Vijay Wadettiwar and Parth Pawar
| Updated on: Oct 02, 2026 | 11:59 AM
Share

विजय वडेट्टीवार यांनी नुकताच मोठे विधान केले. मुंडवा जमीन प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटले की, पार्थ पवारवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मी पीएला पाठविला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार का..? गरीब कारवाईसाठी आणि मोठा मोकाट फिरण्यासाठी का..? पूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. मात्र, सरकारच्या दबावापोटी झाली नाही, असा मोठा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी पुढे म्हटले की, महात्मा गांधी यांच्या जयंती पर्वावर ओबीसीना न्याय आणि जनगणनेत स्वतंत्र कॉलम असावा. यासाठी आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार. स्वातंत्र्यात महात्मा गांधी यांचा प्रचंड मोठा वाटा होता. अहिंसेचा पुजारी म्हणून त्यांना मानलं जातं. म्हणून आम्ही देखील आजचा आंदोलन अहिंसेच्याच्या मार्गाने करण्याचा ठरवला आहे.

सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा नाहीतर त्यांचा असलेला जनाधार ओबीसी भाजपाच्या फसव्या जुमल्याना फसणार नाही. कालच महाज्योतीला 1 हजार कोटी द्यावे अशी मागणी केली आहे. एससी एसटीसाठी तालुकास्तरावर वस्तीगृह आहेत तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचे सरकार आहे. विदेशातून पंडित होत असेल तर कारवाई का होत नाही. तोंडाच्या वाफा काडून लोकांना मूर्ख बनवण्याचे काम आहे. कोणाच्या आंदोलनाला का घाबरता.

लोकशाहीत संविधानाने आंदोलन, उपोषण आणि मोर्चा या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी बॉम्ब किंवा लाट्या घाट्या घेऊन लोक येत नाही. आज गांधी जयंती जगभर साजरी केली जाते. त्यांच्या विचारांना घेऊन शांतीच्या मार्गाने आंदोलन होत असेल तर सरकारची का फाटते हेच कळत नाही. या चुकांचा उग्ररूप धारण करून मोठी चूक सरकार भोगावे लागेल.

आंदोलन चिरडणे म्हणजे मताची चोरी करणाऱ्यांना सरकार समर्थन देते आणि यांची मिलीभगत आणि आशीर्वाद आहे.. त्यामुळे नालायक निवडणूक आयोगाला वाचवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आमदार निधीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, मी एक वर्षाचा जवळपास 18 ते 20 लाख रूपये मुख्यमंत्र्याला देणार.. आवश्यक असेल तर पुढच्या वर्षीचा निधी देखील सरकारला देणार.. दुसऱ्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न मात्र दुष्काळ असताना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी.

जे आंदोलन उभ होत आहे. ते आंदोलन मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन होत आहे.. त्या त्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असेल.. या देशात अराजकता माजवून लुटून खाऊन आंदोलन केल्यावर अर्बन नक्षल म्हणतील. स्वतः तरुणाच्या जीवाशी खेळायच आणि राम मंदिर बोल तर हिंदुविरोधी. बोलून लक्ष विचलित करतात.. पत्रकारांना झालेला धक्काबुक्की निषेधार्य आहे..जो कोणी केला त्याच्यावर कारवाई व्हावी तो सुटता कामा नये.

Follow Us
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल