AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक; विजय वडेट्टीवार संतापले, मागण्यांची थेट यादीच टाकली!

Vijay Wadettiwar News: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी सरकारकडे एक मागणी केली आहे.

दुष्काळाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक; विजय वडेट्टीवार संतापले, मागण्यांची थेट यादीच टाकली!
| Updated on: Sep 26, 2026 | 4:03 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने सरसकट मदतीचं आश्वासन दिले होते. मात्र तसे केले नाही. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच त्यांनी सहकार मंत्र्‍यांवरही निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं आश्वासन दिले. समृद्धी महामार्गाच्या आसपासची पाहणी केली. शेतकऱ्यांवर संकट आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नाही. हातातले पिक गेले आहे. त्यांना वर्ष काढणे कठीण आहे. शेतकऱ्यांना एक लाख मदतीची अपेक्षा होती. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं आहे. यानंतक त्यांनी एक थेट सवाल केला आहे.

ते म्हणाले की, सरकार मुहूर्त कसला शोधत आहे? थातुर मातुर जीआर काढला. जुन्या जीआरमधील तरतूद यात आहे. त्यात तालुका निहाय पाऊस तूट आणि कृषी आयुक्त अहवाल नाही. सरसकट मदत करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते. पण मदत सरसकट केली नाही. या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जवसुली स्थगिती कशी होणार? तातडीने कर्जमाफी करायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, कर्जाचे पुनर्गठन करायचे ठरवले आहे. म्हणजे शेतकरी पुन्हा कर्जाच्या बोझ्याखाली जाणार. यातून काय फायदा होणार? शेतकऱ्यांचा कळवला असेल तर चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पाऊस कमी पडला त्याचा समावेश केला पाहिजे. हेक्टरी एक लाख मदत करा. हेक्टरी मदत करताना अडीच हेक्टर मर्यादा ठेवू नका. पीककर्ज जाचक अटी शर्तीशिवाय माफ करावे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पुढे त्यांनी सहकार मंत्र्‍यांवरही टीका केली आहे.

सहकार मंत्र्‍यांवर बोलताना ते पुढे म्हणाले की, नुसता दुष्काळ जाहीर केला. पण मदत द्यायला वेळ लागणार, असं सहकार मंत्री सांगतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसतात. मंत्री काजू बदाम खातात पण मदत द्यायला मात्र उशीर लावतात. पंचनामे करायचा मुहूर्त ५ ऑक्टोबर आहे. शेतकरी जगणार कसा? अशा पद्धतीने ही शेतकरी फसवणूक आहे. हा जीआर कोरडा आहे. द्यायचं असेल तर मदत त्वरित जाहीर करा, अशा शब्दात वडेट्टीवारांनी टीका केली आहे.

तर दुसरीकडे यावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोरड्या दुष्काळाची घोषणा करताना ज्या उपाययोजना सरकारने जाहीर केल्या त्याही कोरड्या ठाक आहेत. २६५ तालुक्यात आज पहिला ट्रिगर लागू केला असला तरी किमान ३ आठवडे आधी हे ट्रिगर लागू करायला हवे होते.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?