Sindhudurg : नितेश राणेंच्या बालिशपणाने कोकणाची मान खाली गेली-विनायक राऊत

| Updated on: Dec 25, 2021 | 3:30 PM

म्याऊ म्याऊ करून चिडवणे हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही. नितेश राणेंचा तो बालिशपणा.या कोकणाने आदर्श परंपरा निर्माण केली आहे त्याचे भान म्याव म्याव करणाऱ्यांनी राखायला हवं होतं. अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

Sindhudurg : नितेश राणेंच्या बालिशपणाने कोकणाची मान खाली गेली-विनायक राऊत
विनायक राऊत
Follow us on

सिंधुदुर्ग : म्याऊ म्याऊ करून चिडवणे हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही. नितेश राणेंचा तो बालिशपणा.या कोकणाने आदर्श परंपरा निर्माण केली आहे त्याचे भान म्याव म्याव करणाऱ्यांनी राखायला हवं होतं. स्वतःतील पोरकटपणा, बालिशपणा दाखवण्याचा तो विद्रूपपणा होता. नितेश राणेंच्या वागण्याने सिंधुदुर्गवासीयांची मान खाली गेली आहे. अशी घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करत असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत डिवचले होते, त्यावरूनच हा वाद पेटला आहे.

राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध

ओमायक्रॉनमुळे केंद्र आणि राज्य सरकारने सभांवर, राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्यातलाच तो प्रकार आहे त्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. अशी प्रतिक्रिया जेपी नड्डा यांच्या दौऱ्यावर खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तसेच कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात पुणे येथील एका नेत्याच्या मॉलचा कर्मचारी होता, योग्यवेळी त्या नेत्याचे नाव जाहीर करणार, पोलिसांनी पडताळणी करावी असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.

केंद्राकडून राज्याचे 60 हजार कोटी रुपये येणं बाकी

देवेंद्र फडणवीस यांना एक माहिती असायला हवी होती,gst लागू झाल्यानंतर इंधनावरील टॅक्स हा राज्यसरकरचा उत्पनाचा एकमेव मार्ग राहिला आहे. आणि त्याच्यावर जर राज्य सरकारने कपात करायची असेल तर महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारकडे 56 हजार कोटी रुपये आहेत. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. महानगरपालिकांचे साडेचार हजार कोटी केंद्राकडून यायचे आहेत. असे एकूण 60 हजार कोटी रुपये येणं आहे,ते दिलं गेलं तर यावर विचार करता येईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महिलांच्या वार्डरोबमध्ये ‘या’ ब्रा नक्की असाव्यात… तुमच्या वार्डरोबमध्ये आहेत का?

धक्कादायक! तामिळनाडूमधील शाळेत 15 मुलींचे लैंगिक शोषण, एका शिक्षकाला अटक

Taimur Ali Khan | मध्यप्रदेशच्या शाळेत विचारला गेला तैमुर अली खान संदर्भात प्रश्न, पेपर पाहून उडाला गोंधळ!