AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीतील जाचक अटी विरोधात रोहित पवार यांचा एल्गार, पंढरपूरात १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

आता सरकारने एकतर आंदोलनाला परवानगी द्यावी किंवा परवानगी द्यायची नसेल तर शेतकरी कर्जमाफीच्या अटीशर्ती काढून टाकाव्यात.. अन्यथा कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. ते होणारच असाही इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

कर्जमाफीतील जाचक अटी विरोधात रोहित पवार यांचा एल्गार, पंढरपूरात १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
rohit pawar
| Updated on: Jun 11, 2026 | 9:24 PM
Share

गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा पंढरपूरात आपण उद्या शुक्रवार १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहोत अशा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीतील जातक अटी शिथील कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशा मागणीसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात की गेल्या तीन-चार वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत.

येथे पोस्ट वाचा –

रोहित पवार पुढे लिहितात की राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतील या जाचक अटीशर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्व महामानवांच्या प्रेरणेने विठुरायाच्या पंढरीत १२ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढ्याला सहकार्य करून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, ही विनंती! आपल्या या आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे, तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, ही अपेक्षा!

सर्व स्टॉलधारकांनी जागा दिली

छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक असलेल्या परिसरातच पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी आम्हाला ‘अन्नत्याग’ आंदोलन करायचं आहे आणि ते होणारच आहे. ही बाब या परिसरातील स्टॉलधारकांना समजल्याने आणि आमच्या शहराध्यक्षांनीही त्यांना विनंती केल्याने या सर्व स्टॉलधारकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या या प्रामाणिक आंदोलनाला पाठींबा देत तातडीने जागा उपलब्ध करुन दिली. ही आहे माणुसकी, महाराष्ट्र धर्म आणि शेतकऱ्यांविषयीचं प्रेम. पण जी गोष्ट सामान्य जनतेला कळते ती सरकारला कळत नाही, हे दुर्दैव आहे असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा –

काय आहेत मागण्या –

  • 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजारापर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी.
  • एकवेळ समझोतामध्ये (OTS) 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादची अट रद्द करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी.
  • 2 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील रक्कम आधी भरण्याची अट न टाकता सरकारने सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करावी.
  • प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग दोन वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी.
  • 2017 च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांअभावी 2017 कर्जमाफीचा लाभ रखडलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्यात यावी.
  • पिकविमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून 1 रुपयांमध्ये पीकविमा योजना पुन्हा लागू करावी.
  • पेरणीपूर्वी कर्ज खात्याचे पुनर्गठन करुन शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी, जी त्यांना पेरणीसाठी उपयोगी पडेल.
Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत