Wardha : वर्ध्यात भरधाव वाहन पलटून दोन जण ठार, 19 जण जखमी; लग्नासाठी जात असताना घडला अपघात

| Updated on: Apr 09, 2022 | 11:31 PM

पाचोड येथील एका मुलीचे लग्न आर्वीला होते. या लग्नासाठी पाचोड येथील जवळपास 20 जण बोलेरो वाहनाने जात होते. बेढोण्यापुढे असलेल्या घाटामधून जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 19 जण गंभीर जखमी झाले.

Wardha : वर्ध्यात भरधाव वाहन पलटून दोन जण ठार, 19 जण जखमी; लग्नासाठी जात असताना घडला अपघात
अकोल्यात ट्रॅकच्या धडकेने वृद्धाचा जागीच मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वर्धा : लग्नसोहळ्यास जात असलेले वाहन पलटून दोन जणांचा मृत्यू (Death) झाला तर 19 जण जखमी (Injured) झाल्याची दुर्दैवी घटना आर्वी ते वर्धा मार्गावरील बेढोणानजीकच्या घाट परिसरात घडला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. वासुदेव लालसिंग चव्हाण, प्रेमसिंग धनसिंग जाधव अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (At least two people were killed and 19 others were injured when a wedding car overturned in Wardha)

लग्नासाठी चालले होते सर्व जण

पाचोड येथील एका मुलीचे लग्न आर्वीला होते. या लग्नासाठी पाचोड येथील जवळपास 20 जण बोलेरो वाहनाने जात होते. बेढोण्यापुढे असलेल्या घाटामधून जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 19 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

गोलू हेमराज जाधव
गायत्री किसन जाधव
चंचल हेमराज जाधव
सबूबाई जाधव
गुणवंता जाधव
राजेश जाधव
प्रीतम जाधव
यशोदा पवार
पार्वती राठोड
भवरी राठोड
सुमन राठोड
कमलनाथ जाधव
अनिल राठोड
बबली राठोड
अर्जुन जाधव
अंजली राठोड
कल्पना राठोड
लखन राठोड
शोधार्थ राठोड (At least two people were killed and 19 others were injured when a wedding car overturned in Wardha)

इतर बातम्या

Gunratna Sadavarte : पवारांच्या निवासस्थानावर तुफान राडा, अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या सदावर्तेंच्या रिमांडमधील मुद्दे

Jalgaon Murder : जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना