नदीपात्रातून जातानाचा तिघांचा व्हिडीओ व्हायरल, एक जण पाण्यातच लोळतो तेव्हा…

| Updated on: Jul 24, 2023 | 10:54 PM

तीन जणांचा नदीपात्रातील पुल पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तिघेही मद्यपान करून असल्याचं बोललं जातंय.

नदीपात्रातून जातानाचा तिघांचा व्हिडीओ व्हायरल, एक जण पाण्यातच लोळतो तेव्हा...
Follow us on

वर्धा : थरारक अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पावसाच्या पाण्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. वाहत्या पाण्यातून जाऊ नका, असे आवाहन प्रशासनाने केले. पण, दोन घूट चढलेल्यांना त्याचं काय. ते तर नशेत काहीही करू शकतात. नदी असो की, नाला ते सहज जाण्याचं धाडस दाखवतात. असं धाडस त्यांच्यावर बेतणार अशी परिस्थिती होती. पण, सुदैवाने तिघांनाही काही झालं नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या तिघांचं काही खरं नाही, असंच कुणालाही वाटेल.

तिघेही सुखरूप बाहेर

पुलावरून पाणी वाहत असताना तीन जणांचा नदीपात्रातील पुल पार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. तिघेही मद्यपान करून असल्याचं बोललं जातंय. व्हिडीओ पुलगाव शिवारातील वर्धा नदीपात्रातील जुन्या पुलावरील असल्याचं बोललं जातंय. सुदैवानं तिघेही सुखरूप बाहेर निघाले.

तिघेही मद्यधुंद असल्याचं दिसतं

व्हिडियो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. व्हिडीओत तीन जण दिसत असून, तिघेही मद्यधुंद असल्याच दिसतंय. गाडी पुढं नेण्याकरिता पुलावरील अडकलेलं लाकूड एक जण फेकतो. एक जण थोडा वेळ पाण्यातच लोळतो. दोन जण दुचाकी आणल्यानंतर त्याला परत आणतात. एखाद्याचा तोल गेला असता तर हा प्रकार जीवावरही बेतू शकला असता. सुदैवाने तिघेही सुखरूप नदीपात्राच्या बाहेर निघाले.

नदी-ओढ्यांना पूर

लातुर जिल्ह्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागात मोठा पाऊस झाल्याने नदी-ओढ्यांना पूर आला आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनी ते तगरखेड दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर जाहिराबाद,भालकीकडून लातुरकडे येणारी वाहतूक बसव कल्याणमार्गे वळवण्यात आली आहे. जामखंडी जवळच्या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. बाजूने केलेला पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. लातुरवरून भालकीकडे जाणारी वाहतूक देखील व्हाया उमरगा वळविण्यात आली आहे.