AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वाह रे पठ्ठ्या ! प्रभागतली लाईट बंद, भाजप नगरसेवकानं नगर परिषदेच्या कार्यालयातले लाईट शोधून शोधून फोडले

वाशिम नगर परिषदेला शहरातील अनेक प्रभागासाठी वारंवार स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करून संबंधित विभाग हे लाईट लावत नसल्याने भाजपचे नगरसेवक अमित मानकर यांनी नगरपालिकेच्या मनमानी कारभारा विरुद्ध आक्रमक भूमिका घेत वाशिम नगर परिषद कार्यालयातील विद्युत विभागामधील सर्व लाईट फोडून टाकली.

Video: वाह रे पठ्ठ्या ! प्रभागतली लाईट बंद, भाजप नगरसेवकानं नगर परिषदेच्या कार्यालयातले लाईट शोधून शोधून फोडले
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 6:52 PM
Share

वाशिमः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ग्रामीण भागात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे अनेकदा आठवड्यातील ठरावीक दिवशी काही वेळेसाठी वीज प्रवाह खंडित करण्यात येतो. पण नंतर तो पूर्ववतसुद्धा होतो. पण वाशिममधल्या नगर परिषदेच्या हद्दीतील स्टीट लाईटची चक्क 15 दिवसांपासून बत्ती गुल आहे. त्यामुळे तिथले स्थानिक प्रचंड संतापलेत.

घटस्थापना असूनसुद्धा लाईटचे काम पूर्ण केले नाही

वाशिम येथे गेल्या 15 दिवसांपासून प्रभागातील काही ठिकाणी लाईट बंद होते, वारंवार सूचना देऊनसुद्धा अधिकारी काम करत नाहीत. घटस्थापना असूनसुद्धा लाईटचे काम पूर्ण केले नव्हते, जर जनतेला अंधारात राहावं लागत असेल, तर अधिकाऱ्यांनासुद्धा लाईट खाली बसण्याचा अधिकार नाही, असं म्हणत भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप नगरसेवक अमित मानकर यांनी वाशिम नगर परिषदमधील अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधील लाईटची तोडफोड केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भाजपचे नगरसेवक अमित मानकर नगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरुद्ध आक्रमक

वाशिम नगर परिषदेला शहरातील अनेक प्रभागासाठी वारंवार स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करून संबंधित विभाग हे लाईट लावत नसल्याने भाजपचे नगरसेवक अमित मानकर यांनी नगरपालिकेच्या मनमानी कारभारा विरुद्ध आक्रमक भूमिका घेत वाशिम नगर परिषद कार्यालयातील विद्युत विभागामधील सर्व लाईट फोडून टाकली. जोपर्यंत शहरातील नागरिक अंधारात राहतील तोपर्यंत न.प. विभागातील मुजोर व कामचुकार कर्मचाऱ्यांना लाईट खाली बसू देणार नाही, असा इशाराही नगरसेवक अमित मानकर यांनी दिला. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

अनेक वर्षांपासून विद्युत पोलवर असलेले स्ट्रीट लाईट बंद पडलेल्या अवस्थेत

वाशिम न.प.चे भाजप नगरसेवक अमित मानकर हे वारंवार वाशिम शहरातील प्रभागामध्ये मागील अनेक वर्षांपासून विद्युत पोलवर असलेले स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहे, याची दुरुस्ती करून लाईट सुरू करण्यात यावे आणि ज्या ठिकाणी नवीन विद्युत पोल लावण्यात आले, तेथे स्ट्रीट लावण्यात यावी, अशी मागणी करत होते. मात्र वाशिम न. प. मनमानी कारभार सुरू असून, संबंधित विभागातील मुजोर, कामचुकार कर्मचारी हे नियमानुसार काम करीत नसून संतापलेले नगरसेवक यांनी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलीय.

तोपर्यंत एकही कर्मचाऱ्याला लाईट खाली बसू देणार नाही

घटस्थापना दिवस असूनही शहरातील लाईट लागलेली नाही. आता जोपर्यंत शहरातील नागरिक अंधारात राहतील, तोपर्यंत एकही कर्मचाऱ्याला लाईट खाली बसू देणार नाही. तसेच दोन दिवसांत शहरातील बंद पडलेले आणि पोलवरील नसलेले लाईट लावले गेले नाही, तर पूर्ण वाशिम नगर परिषद कार्यालयाचा विद्युत पुरवठा बंद करेन, असा इशारा नगरसेवक अमित मानकर यांनी दिलाय. संबंधित बातम्या

ZP Election Result 2021 : प्रत्येक ठिकाणचं सत्तेचं गणित किती बदललं, कोणत्या पक्षाला तोटा, कुणाला फायदा?

Washim Municipal Council lights in the ward were turned off, the BJP corporator found the lights in the MSEDCL office and broke them

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.