Video – The Burning Truck | वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, चालकाचा वाचला जीव

अकोला येथील ट्रक वाशिमला जात होता. अचानक आग लागल्यानं ट्रक पेटून त्याची राख झाली. या ट्रकने पेट कशी घेतली, केमिकल कोणतं होतं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Video - The Burning Truck | वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, चालकाचा वाचला जीव
अकोला येथे ट्रकला लागलेली भीषण आग.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 1:30 PM

अकोला : ट्रान्सपोर्टचा ट्रक (Transport’s Truck) पलटी होऊन लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला. अकोला ते पातूर रोडवरील हिंगणा फाट्याजवळ आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्रान्सपोर्टच्या साहित्याने भरलेला ट्रक वाशिमकडं (Washim) जात होता. पलटी होताच ट्रकला आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की यात ट्रक जळून खाक झाला. ही आग विझवायला अग्निशमनच्या दोन गाड्या लागल्या. वेळीच ट्रॅक ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आले. त्यामुळं ट्रक ड्रायव्हरचे प्राण वाचले आहे. पण ही आग नेमकी कशामुळे लागली. या ट्रान्सपोर्टच्या साहित्यात कुठले ज्वलनशील तर नव्हतं न याचा तपास जुने शहर पोलीस (Old City Police) करत आहेत.

भीषण आग लागण्याचे कारण काय?

ट्रकने पेट घेतल्यानंतर ज्वाळा निघत होत्या. त्या ज्वाळा पाहूनच आगीची तिव्रता लक्षात येते. त्यामुळं या ट्रकमध्ये असे काय होते की, एवढी मोठी आग लागली याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. चालकच याबद्दल सांगू शकेल. चालक या घटनेत जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवितहानी झाली नसली, तर वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

पाहा व्हिडीओ

Bhandara | धुळवडीनंतर अंघोळीला नदीवर गेला युवक, पोहता येत नसल्याने वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

IMD | चंद्रपुरात पारा भडकला, तापमान 43 डिग्री सेल्सिअसवर, विदर्भात 48 तास उष्णतेच्या लाटेचे!

दिलासादायक! यंदा पाणीटंचाई नाही; राज्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा