नेपाळ, बांगलादेशात झालं ते करू शकलो असतो, पण… अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले?

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाला हिंसक वळण लागलं, या पार्श्वभूमीवर बोलताना आता अभिजीत दिपके यांनी मोठं विधान केलं आहे.

नेपाळ, बांगलादेशात झालं ते करू शकलो असतो, पण... अभिजीत दीपके नेमकं काय म्हणाले?
abhijeet deepke
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 8:31 PM

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, दरम्यान त्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. परंतु या लाठीचार्जनंतर या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढला, विरोधी पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर बोलताना आता अभिजीत दिपके यांनी मोठं विधान केलं आहे.  अभिजीत दिपके यांनी ‘टिव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके? 

त्यांना वाटलं लाठीमार केल्याने मुलं घाबरून घरी जातील, आंदोलन संपेल पण ते चुकले. लाठीमारमुळे आमचं आंदोलन मोठं झालं. २० तारखेला आम्ही सिद्ध करून दाखवलं, नेपाळ आणि बांगलादेश सारखं या देशात होणार नाही. गर्दी मोठी होती मला करता आलं असतं. पण केलं नाही थांबलो. आपला देश बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींच्या मार्गावर जाणारा आहे. मुलांना मारलं, मी म्हटलं हे चालणार नाही. आम्ही थांबलो. आम्हाला करायचं असतं तर आम्ही केलं असतं. पण आम्हाला करायचं नव्हतं. आमचं संविधानावर प्रेम आहे. त्यामुळे आम्ही असं करूच शकत नव्हतो, असं यावेळी बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, जंतमरमंतर बाहेर जॅमर होते. मला माहीत नाही. मी मीडियाला सांगत होतो काय चाललंय ते दाखवा. त्यांचे फिडही जात नव्हते. हा सुनोयिजित प्लान होता. आम्ही संपर्क करू नये हा त्यामागचा हेतू होता. गर्दी किती झाली हे मला कळू नये म्हणून जॅमर लावले होते. मला गर्दी कळली असती तर त्याच दिवशी आम्ही राजीनामा घेतला असता. जंतरमंतरवर कशासाठी लाठीमार केला? मुलांना इतकं मारा की सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे, हा त्यामागे मेसेज होता, असंही यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us