Abhijeet Dipke : अभिजीत दीपके पुन्हा आक्रमक, महिन्याभरात आणखी एक मोठी घोषणा, फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार
अभिजीत दीपके यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महिन्याभरात आणखी एक मोठी घोषणा केली आहे. दीपके यांच्या घोषणनेने फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने ‘स्कूल ठीक करो’ अभियानानंतर आता आणखी एक मोहीमेची घोषणा केली आहे. काही दिवसांआधी कॉक्रोच जनता पार्टीने सरकारी शाळांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी ‘स्कूल ठीक करो’ मोहीम राबवलं होतं. त्यानंतर आता नागपुरात बुधावारी ‘आदिवसी स्कूल ठीक करो’ मोहीमेची घोषणा केली आहे. आता कॉक्रोच जनता पार्टी आदिवासी भागात असलेल्या शाळांची पाहणी करणार आहे. भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड या भागात आदीवासी समाजाची मोठी संख्या आहे.
नीट पेपर फुटीच्या विरोधात जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मागील काही दिवसांपासून ‘स्कूल ठीक करो’ या मोहीमच्या माध्यमातून महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील सरकारी शाळांची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. सीजेपीने कर्नाटक, झारखंड, पंजाबमधील काही शाळांची देखील पाहणी केली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये आदिवावसी विद्यार्थ्यांचा संशयित मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी संबंधित शाळेची पाहणी केली होती. त्यांनंतर आता त्यांनी आदिवासी भागातील शाळांची पाहणी करण्याची नव्या मोहीमेची घोषणा केली आहे.
अभिजीत दीपके यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके म्हणाले, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली आहेत. त्यानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेचा विकास झालेला नाही. वेगवेगळ्या सरकारने आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलं आहे. यासाठी कोणतंही एक सरकार दोषी नाही. या स्थितीला सर्व सरकार जबाबदार आहेत, असा आरोप दीपकेंनी केला.
दीपके यांनी पुढे सांगितले की, ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या मोहिमेतंर्गत आदिवासी भागातील शाळांची पाहणी केली जाईल. या शाळांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली जाईल. विद्यार्थी कोणत्या परिस्थिती शिक्षण घेत आहेत, याची तपासणी केली जाईल. आम्ही सरकारला आवाहन करत आहे की, आदिवासी भागात असलेल्या शाळांची सुधारणा करावी. आदिवासी विद्यार्थ्यांमध्येही क्षमतेची कमतरता नाही. परंतु त्यांना सरकारची मदत मिळत नाही.
सीजेपी प्रमुख दीपके यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हीच आकडेवारी मुंबईतून आली असती, तर संपूर्ण देशात खळबळ उडाली असतो. परंतु आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणतीही किंमत नाही का? मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये मागील तीन महिन्यात 30 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला, अशी माहिती दीपकेंनी सांगितली.
