AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणी नवा ट्विस्ट! ‘ती’ रहस्यमयी तरुणी कोण? पोलिसांच्या खुलाशानं वाढवलं गूढ!

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणी एका नवा ट्विस्ट आला आहे. दिशा हिला रुग्णालयात नेणाऱ्या रहस्यमयी तरुणीबद्दल मोठा दावा समोर आला असून पोलिसांच्या खुलाशानं मोठं गुढ वाढवलं आहे...

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणी नवा ट्विस्ट! 'ती' रहस्यमयी तरुणी कोण? पोलिसांच्या खुलाशानं वाढवलं गूढ!
Disha Salian
| Updated on: Sep 16, 2026 | 4:25 PM
Share

Disha Salian Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यान निधनाच्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिने अखेरचा श्वास घेतला. आता दिशा हिच्या निधनाप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबतची चौकशी, सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे. दिशाच्या मृत्यूबाबत आता अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे त्या रात्री घडलेल्या घटनांविषयी नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिशाला शताब्दी रुग्णालयात नेणाऱ्यांमध्ये ती रहस्यमयी तरुणी कोण होती?

जबाबामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा उल्लेख

शताब्दी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार संतोष कचिरात गुंगुणे यांचा जबाब 15 जून 2020 रोजी नोंदवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या जबाबात डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यानुसार दिशाला दोन मुलं आणि एका मुलीने रुग्णालयात आणलं होतं. तसेच, या तरुणांपैकी एकाची ओळख हिमांशू शिखरे अशी पटल्याचा उल्लेखही या जबाबात आहे.

अशात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे आणि तो म्हणजे, ती मुलगी नेमकी कोण होती. परंतु पोलीस रेकॉर्डमध्ये वेगवेगळी माहिती का नोंदवली गेली? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दिशाचा मंगेतर रोहन राय आणि या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या जबाबांमध्ये, तिला रुग्णालयात नेणारे म्हणून हिमांशू शिखरे आणि इंद्रनील वैद्य यांच्या नावाचा उल्लेख आढळतो. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशातही रोहन रायच्या सप्लीमेंट्री स्टेटमेंटचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, दिशाला हिमांशू आणि इंद्रनील यांनी रुग्णालयात नेलं होतं.

एवढंच नाही तर, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जबाबात दोन मुलं आणि एका मुलीचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच, आता तपासाचा एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांमध्ये तिसरी व्यक्ती एक मुलगी होती का? तर तिची ओळख काय? आता सीसीटीव्हीच्या मदतीने

त्या तरुणीची ओळख काय?

जर त्या रात्री दिशाला रुग्णालयात नेणाऱ्यांमध्ये तरुणी उपस्थित होती, तर तपासात हे स्पष्ट होणं आवश्यक आहे की तिचं नाव काय होतं? ती दिशासोबत कशी पोहोचली? तिचा मोबाईल नंबर किंवा लोकेशन रेकॉर्ड तपासला गेला का? रुग्णालयात उपस्थित सीसीटीव्हीवरून तिची ओळख पटवली गेली का? आता सोशल मीडिया आणि काही लोकांकडून असा दावा केला जात आहे की, शताब्दी रुग्णालयात दिशासोबत उपस्थित असल्याचे सांगितली जात असलेली तरुणी राधिका नेहलानी असू शकते.

हा दावाही केला जात आहे की, राधिका तीच महिला होती, जिचे नाव सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ आणि चर्चांमध्ये समोर आलं होतं. मात्र, या दाव्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!