AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC : 1 कोटींच्या प्रश्नावर अडकली अर्पिता, क्विट केला गेम; राष्ट्रपती, पंतप्रधान आणि स्पीकरशी निगडीत प्रश्नाचं उत्तर काय? तुम्हाला माहित्ये ?

'KBC 18'मधील स्पर्धक अर्पिता झाने 50 लाख जिंकून गेम क्विट केला. तिला 1 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न हा राष्ट्रपती, पंतप्रधान आणि स्पीकर यांच्याशी निगडीत होता. मात्र लाइफलाईन संपल्यामुळे तिने जास्त जोखीम पत्करली नाही. काय होता तो प्रश्न, तुम्हाला माहित्ये का उत्तर ? चला जाणून घेऊया..

KBC : 1 कोटींच्या प्रश्नावर अडकली अर्पिता, क्विट केला गेम; राष्ट्रपती, पंतप्रधान आणि स्पीकरशी निगडीत प्रश्नाचं उत्तर काय? तुम्हाला माहित्ये ?
KBC 18
| Updated on: Sep 16, 2026 | 4:40 PM
Share

‘कौन बनेगा करोडपती ‘चा 18 वा (KBC) सीझन सध्या उत्साहात सुरू आहे. या सीझनच्या शुक्रवारच्या भागात आलेल्या एका स्पर्धकाी आपबिती ऐकून सगळेच हेलावले. अर्पिता झा नावाच्या य तरूणीने या भागात 50 लाख रुपये जिंकले, त्यानंतर शो संपला. तिचा पुढला प्रवास सोमवारच्या भागात कंटिन्यू दाखवण्यात आला. त्यावेळी ती 1 कोटी रुपयांसाठी खेळत होती. एपिसोडमध्ये प्रेक्षकांना अर्पिताची हुशारी पाहायला मिळाली. अर्पिताने संपूर्ण खेळात आपल्या लाइफलाइनचा अतिशय विचारपूर्वक वापर केला आणि एकामागून एक प्रश्नांची उत्तरे देत टॉपपर्यंत मजल मारली. याचदरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सांगितले. वडिलांवरील कर्ज आणि घरातील आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत तिने आपल्या आई-वडिलांना सुख-समाधानाचे आणि आरामदायी आयुष्य देता यावे, हेच मोठं स्वप्न असल्याचं सांगितलं.

या भागात अर्पिताला जेव्हा 1 कोटीचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिच्याकडे एकही लाईफलाइन उरली नव्हती. 1 कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाबाबात तिच्याकडे खात्रीशीर उत्तर नव्हतं, त्यामुळे तिने रिस्क न घेता गेम क्विट केला.खेळ सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तिला एक उत्तर निवडण्यास सांगितलं, मात्र तिचं उत्तर चुकीचं ठरलं आणि अखेर अर्पिता 50 लाख रुपये जिंकून शोमधून बाहेर पडली.

1 कोटीसाठी कोणता होता प्रश्न ?

1 कोटींसाठी अर्पिताला जो प्रश्न विचारण्यात आलेला तो असा होता—

ऑगस्ट 2026 पर्यंत, कोणत्या देशात महिला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसदेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत?

(A) इटली (B) आइसलँड (C) लात्विया (D) माल्टा

या प्रश्नाच्या वेळी अर्पिताकडे एकही लाइफलाइन शिल्लक नव्हती. त्यांना योग्य उत्तराबाबत खात्री नसल्याने तिने कोणतीही जोखीम न घेता 50 लाखांवर गेम थांबवण्याचा निर्णय घेतला. गेम क्विट केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तिला उत्तराचा अंदाज लावण्यास सांगितले. अर्पिताने ‘लात्विया’ हा पर्याय निवडला. मात्र, तिचा अंदाज चुकीचा ठरला आणि ‘आइसलँड’ हे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं.

आइसलँड हे योग्य उत्तर का?

या प्रश्नाचे योग्य उत्तर आइसलँड होते. हाला टोमासडॉटिर 2024 पासून आइसलँडच्या राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. क्रिस्त्रुन फ्रॉस्टाडॉटिर 2024 पासून देशाच्या पंतप्रधान आहेत. तसेच, थोरुन स्वेनब्जार्नार्डॉटिर 2025 पासून आइसलँडच्या संसदेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशाप्रकारे, 1 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्याने अर्पिताने सावध भूमिका घेत गेम क्विट केला आणि 50 लाखांची रक्कम सुरक्षित केली.

शो मध्ये सांगितली आपबिती

शुक्रवारच्या एपिसोडमध्ये अर्पिताने आपल्या आयुष्यातील संघर्षमय काळातील काही आठवणी शेअर केल्या. एक काळ असा होता, जेव्हा तिच्या वडिलांची महिन्याची कमाई अवघी 5 हजार रुपये होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि त्यांचे जीवन बदलावे, या उद्देशाने तिच्या वडिलांनी ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय सुरू केला. मात्र, दुर्दैवाने हा व्यवसाय यशस्वी झाला नाही आणि त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. व्यवसायात नुकसान झाल्यानंतर कुटुंबावर कर्जाचा मोठा बोजा झाला. परिस्थिती इतकी बिकट झाली की, कर्ज वसूल करणारे लोक त्यांच्या घरी येऊन कुटुंबाला धमकावू लागले. या कठीण काळात अर्पितानेही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अनेक छोटी-मोठी कामं केली.

अडचणींचा सामना करत असतानाही तिने आपले शिक्षण थांबवले नाही. इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने 5 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले. मात्र, व्याजामुळे हे कर्ज वाढून तब्बल 8 लाख रुपये झाले. गेल्या काही वर्षांपासून अर्पिता मेहनत आणि प्रामाणिकपणे हे कर्ज फेडत्ये.

आई-वडिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं  स्वप्न

अर्पिताने पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नाबद्दल सांगितलं होतं. तिला आपल्या आई-वडिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करून त्यांना एक सुरक्षित आणि चांगले आयुष्य द्यायचं आहे. आपल्या कुटुंबाने भोगलेल्या आर्थिक अडचणी पुन्हा त्यांच्या आयुष्यात येऊ नयेत, अशी तिची इच्छा आहे.

Follow Us
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?