AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात पावसाचा ॲलर्ट

आयएमडीनं 8 आणि 9 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो ॲलर्ट केला आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात पावसाचा ॲलर्ट
weather update
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 06, 2022 | 1:14 PM
Share

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं पुढील चार दिवसात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 6 ते 9 जानेवारी दरम्यान हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीनं 8 आणि 9 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो ॲलर्ट केला आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात हलक्या पावसाची शक्यता

उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर जाणवणार आहे. येत्या चार दिवसात राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 जानेवारी : धुळे,नंदुरबार 7 जानेवारी : धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर 8 जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग 9 जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग

पुढील चार दिवसात अवकाळी पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आगामी 4 दिवसात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर नाशिक,अहमदनगर ठाणे आणि पालघर मध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्येही पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयएमडीकडून अ‌ॅलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळं बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

अवकाळीचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार?

आगामी चार दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं आणखी एकदा नुकसान होण्याची भीती आहे.

कोल्हापूरमध्ये धुक्याची चादर

वाढलेल्या थंडीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरली आहे.बोचरी थंडी आणि धुक्याची चादर असं हे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अनुभवायला मिळतंय. विशेषतः नदीकाठच्या भागात या थंडीचा जोर अधिक दिसून येतोय. धुक्याची चादर पसरल्यानं वाहनधारकांना सकाळी देखील गाडीची लाईट सुरु करून प्रवास करावा लागतो तर थंडी पासून बचाव करण्यासाठी गरम कपडे घालूनच नागरिकांना बाहेर पडावे लागतंय. कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. पुढच्या काही दिवसात हा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापेक्षाही बोचर्‍या थंडीचा सामना कोल्हापूरकरांना करावा लागणार आहे.

इतर बातम्या:

Cotton Rate : उत्पादन घटल्यानेच कापसाला विक्रमी दर, हंगामात अतिवृष्टीचा अडसर कायम राहिला

अंबा साखर कारखाना पवारांच्या घशात घालण्याचा डाव, माजी आमदार माणिक जाधव यांचा आरोप

Weather Forecast imd predicted unseasonal rain due to western disturbance Marathwada and Vidarbha North Maharashtra in next four days issue yellow alert

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?