Marathi News » Photo gallery » Satara Karad Farmer started making color from cow dung also benefit to farmers
कराडच्या सतीश बडे यांची कमाल, शेणापासून रंगनिर्मिती; परदेशातही मागणी, शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक आधार
गाईच्या शेणाचे महत्व परदेशात वाढत असताना भारतात मात्र अजूनही शेणाचा वापर आर्थिक कमाईसाठी फार कमी प्रमाणात केला जातो. गाई पासून अनेक फायदे आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होते व गोशाळांची व देशी गायींची संख्या रोडावत असल्याचं पाहायला मिळतं.
गाई वाचवायचे असेल गोशाळा व देशी गायी वाचणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी देशी गायीपासुन उत्पन्नाचे साधन निर्माण करून स्वावलंबी होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने गो शाळांना व शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा व रंगा मुळे घराची सात्त्विकता टिकून राहावी यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड येथील नवउद्योजक सतीश बडे यांनी गायीच्या शेणापासून पर्यावरण पूरक रंग पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून महिन्याकाठी पाच ते सहा लाखांची उलाढाल होत असून अनेकांना रोजगार प्राप्त झाला आहे. सर्व कडक तपासण्यातून तयार होणा-या बडे यांच्या गौरंग वैदिक पेंटला देशासह परदेशातुन मागणी येत आहे त्यांनी तयार केलेल्या ऑरगॅनिक पेंटला परदेशातुनही मागणी आहे.
1 / 9
कराडच्या सतीश बडे यांनी गायीच्या शेणापासून पॅन्ट निर्मितीची कल्पना सुचली व त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेणाचा पेंट म्हणून कसा वापर करता येईल याचा वर्षभर अभ्यास करण्यात आला. बऱ्याच प्रयत्नानंतर आणि गोमूत्र वापरून पेंट तयार करण्यात आला.
2 / 9
नॅशनल टेस्टिंग हाऊस मुंबई येथे रंगाची व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड अर्थात V O C टेस्ट करण्यात आली. voc नगण्य असेल तर ते प्रॉडक्ट चांगले समजले जाते. बाकी सर्व केमिकल कंपन्यांच्या पॅन्टची voc 30ते 40 टक्क्यांच्या पुढे असताना बडे यांच्या गौरंग वैदिक पेंटचा voc 1.94 इतका आला.
3 / 9
पहिला अडथळा पार पडला त्यानंतर पुण्यातील कुलकर्णी लॅब मध्ये केलेल्या तपासणीत हा ऑर्गेनिक पेंट तब्बल सहा ते सात डिग्री तापमान नियंत्रित करत असल्याचे निष्पन्न झाले. रंग मारल्यावर भिंतीवरील कीटकांचे प्रमाण कमी झाले तसेच केमिकल पेंटसारखे भिंतीवर शेवाळ देखील वाढले नाही. घरातील वातावरण शांत सात्त्विक सकारात्मक राहिले. अशा अनेक परिक्षणातून गोरंग वैदिक पेंट बाजारात दाखल झाला आहे. सतीश बडे यांना येत्या काही दिवसात या पेंटचे पेटंट ही मिळेल, असं सांगितलं.
4 / 9
या पेंटला देशभरासह परदेशातूनही मागणी येत आहे मात्र तांत्रिकदृष्ट्या सध्या निर्यात शक्य नसल्याचे बडे यांनी सांगितले सध्या देशभरातील मागणी पूर्ण करण्यास भांडवलाअभावी आम्ही कमी पडत असून या पेंटला लोकांनी पसंती दिली आहे या पेंट मुळे पर्यावरणास आरोग्याचे रक्षण देशी गोपालनास प्रोत्साहन मिळत आहे, असं सतीश बडे यांनी सांगितलं.
5 / 9
पेंटसाठी लागणारे शेण स्थानिक शेतकरी व गो शाळेतून पाच रुपये किलो प्रमाणे विकत घेतले जाते. शेतकऱ्यांनी हे शेण वर्षभर साठवून खत तयार केले असता केवळ प्रति किलो एक रुपया मिळतो मात्र रंग तयार करण्यासाठी प्रति किलो पाच ते दहा रुपये किंमत मिळते. त्यामुळे गोशाळेचे व देशी गाय पाळणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही दुप्पट ते तिप्पट पटीने वाढले,असल्याची माहिती देशी गायी पाळलेले शेतकरी दादासो शिंदे यांनी दिली
6 / 9
ज्या लोकांनी घरी कार्यालयात गोरंग वैदिक रंग वापरला आहे त्यांनी रंगाबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी इतर लोकांना या रंगाचे फायदे सांगून रंग वापरण्यास प्रवृत करतायत, अशी माहिती अनेक वर्ष रंग काम करणारे उमेश पाटील यांनी दिली आहे
7 / 9
गाईच्या शेणाचे महत्व परदेशात वाढत असताना भारतात मात्र अजूनही शेणाचा वापर आर्थिक कमाईसाठी फार कमी प्रमाणात केला जातो. गाई पासून अनेक फायदे आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होते व गोशाळांची व देशी गायींची संख्या रोडावत असल्याचं पाहायला मिळतं.
8 / 9
गाई वाचवायचे असेल गोशाळा व गायी वाचणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी गायीपासुन उत्पन्नाचे साधन निर्माण करून स्वावलंबी होणे आवश्यक आहे हे सिध्द होत आहे.