Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, पाऊस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

महाराष्ट्रात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. गेल्या दीन महिन्यापासून राज्यात पाऊस झाला नाही. मात्र आता दिलसादायक बातमी आहे, ती म्हणजे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (weather expert Panjabrao Dakh ) यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, पाऊस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
पंजाबराव डख हवामान अंदाज
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 9:43 PM

महाराष्ट्रात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. गेल्या दीन महिन्यापासून राज्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचे डोळे पावसाच्या पाण्याकडे लागले आहेत. मात्र आता दिलासादायक बातमी म्हणजे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही प्रमाणात का होईना पिकांना जीवदान मिळणार आहे. तसेच हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील 72 तास राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामा तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

     काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज?  

23 आणि 24 सप्टेंबर दरम्यान पूर्व विदर्भात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडले, हा पाऊस सर्वदूर होणार नाही. विशाखा पट्टमच्या जवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा 24 आणि 25 सप्टेंबर दरम्यान नागपूरकडे सरकणार आहे. त्यामुळे तीन दिवस पूर्व विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर पश्चिम विदर्भात रिमझिम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. विदर्भानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये देखील रिमझिम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नंदूरबार, नाशिक, बीड लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. हा पाऊस देखील सर्वदूर अशा स्वरुपाचा नसेल, काही ठिकाणी पाऊस होईल, काही ठिकाणी पाऊस होणार नाही. मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतामधून पाणी बाहेर निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने देखील राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 48 तासांमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us