लग्नात नाचताना चुकून लागला धक्का; आनंदाचे वातावरण शोकात पसरले, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात डिजेवर नाचत असताना एका तरुणाचा चुकून धक्का लागला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची सुरु झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर धक्कादायक घटनेत झालं.

लग्नात नाचताना चुकून लागला धक्का; आनंदाचे वातावरण शोकात पसरले, नेमकं काय घडलं?
बुलढाणा
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 26, 2026 | 1:35 PM

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नातील डीजेवर नाचताना लागलेल्या एका क्षुल्लक धक्क्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले असून, एका 23 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बर्डे प्लॉट परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता नेमकं काय घडलं आहे चला जाणून घेऊया…

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शोएब खान अमीन खान (वय २३, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डीजेच्या तालावर अनेक तरुण नाचत होते. हे तरुण मजामस्ती करत नाचताना दिसत होते. नाचत असताना शोएब खान याचा धक्का चुकून दुसऱ्या एका तरुणाला लागला.

वादाचे हिंसक वळण आणि भीषण हल्ला

नाचताना लागलेल्या या धक्क्यावरून सुरुवातीला दोन्ही बाजूंनी शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच या वादाने हिंसक वळण घेतले. परिसरातील 4 ते 5 जणांनी संगणमत करून शोएबवर धारदार शस्त्रे आणि ‘फायटर’ने भीषण हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, गंभीर जखमी झालेला शोएब जागीच ठार झाला.

पोलिसांचा बंदोबस्त आणि तपास

घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमुळे परिसरात तणाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

Follow Us