AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दे धपाधप… लग्नाला आले अन् एकमेकांच्या बोकांडी बसले, नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने तुफान राडा; Video Viral

Wedding Fighting Video : जालन्यातील अंबड तालुक्यात लग्न समारंभात नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने वधू-वर पक्षात जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दे धपाधप... लग्नाला आले अन् एकमेकांच्या बोकांडी बसले, नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने तुफान राडा; Video Viral
Jalna Wedding FightingImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 08, 2026 | 7:28 PM
Share

लग्न म्हटलं की आनंदाचा क्षण, सगळेजण नटून थटून विवाह सोहळ्याला हजेरी लावतात. लग्नांमुळे नाती गोती वाढत जातात. भारतात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा आढळतात. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रथा आहेत. एकंदरीतच लग्नात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच मजा करतात. मात्र आता जालन्यातील एका लग्नाची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने लग्न मंडपात राडा वधू-वर पक्षात हाणामारी झाली आहे. 3 तारखेला ही घटना घडल्याचे समोर आले आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लग्नात तुफान हाणामारी

लग्नात नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने झालेल्या वादाच रुपांतर हाणामारीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या नांदी गावात 3 तारखेला लग्न पार पडले. या लग्नात नवरदेवाचा बूट नवरीकडील लोकांनी लपवला तर नवरीचां चप्पल नवरदेवाच्या भावाने लपवा असता नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारला. यातून दोघात वाद झाल्याने दोन्ही बाजूचे वऱ्हाड एकमेकांवर तुटून पडले.

सोन्याचे दागिने गेले चोरीला

या घटनेमुळे दोन्ही बाजूच्या मंडळींमध्ये प्रचंड वाद उफाळून आला यात नवरदेवाने हस्तक्षेप केला, मात्र या राड्यात त्याचेही कुणी ऐकले नाही. या प्रकरणी वधू कडील ज्ञात आणि अज्ञात 14 जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नवरदेवाकडील 7 आणि 15 ग्रॅम चे सोन्याचे दागिने देखील चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूचे वऱ्हाडी एकमेकांना मारहाण करत आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. अनेक महिला एकमेकींना मारत आहेत. तसेच पुरुषही आक्रमक होत एकमेकांना ठोसे मारताना पहायला मिळत आहे. किरकोळ कारणामुळे झालेल्या या भांडणाची चर्चा आता संपूर्ण राज्यात होताना दिसत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?