AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Megablock : गरज असेल तरच घराबाहेर पडा… उद्या रविवारी तिन्ही मार्गांवर… मेगाब्लॉकची नवी अपडेट घ्या जाणून

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर वीकेंडला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-कसारा मार्गावर 15 तासांचा ब्लॉक, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे लोकल सेवा बाधित राहील. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई लोकलचे सुधारित वेळापत्रक आणि पर्यायी मार्ग तपासावे, जेणेकरून प्रवासात गैरसोय टाळता येईल.

Mumbai Megablock : गरज असेल तरच घराबाहेर पडा… उद्या रविवारी तिन्ही मार्गांवर… मेगाब्लॉकची नवी अपडेट घ्या जाणून
| Updated on: Apr 25, 2026 | 12:25 PM
Share

रोजच्या रोज लाखो लोकांना इच्छित स्थळी पोहोचवारी, रेल्वे म्हणजे मुंबईकरांसाठी तर लाइफलाइनच झाली ना. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे, या तिनही मार्गांवरून ्नेक जण रोजच्या रोजा कामासाठी, ऑफीस, कॉलेजला जाण्यासासाठी प्रवास करतात. अविरत धावणाऱ्या या लोकलगाड्या मात्र कधीच थांबत नाहीत, असं असलं तरीही काही वेळा दुरूस्तीसाठी, देखभालीच्या कामांसाठी रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जातो. त्याचप्रमाणे रेल्वे मार्गावर आज आणि उद्या रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे बाहेर पडायच्या आधी ही बातमी वाचूनच निघा. मेगाब्लॉकचं टाईमटेबल वाचून मगच निर्णय घ्या.

आसनगाव – कसारा लोकल आज बंद मध्य रेल्वेवर 15 तासांचा ब्लॉक

मध्य रेल्वेवरील कल्याण कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामाकरिता उंबरमाळी आटगाव स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी आज, शनिवार 25 एप्रिल रोजी दुपारपासून सुमारे 15 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध नसतील. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12 पासून ते मध्यरात्री 3 पर्यंत उंबरमाळी आटगावदरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गिकांवर ब्लॉक असेल. त्यामुळे कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव किंवा टिटवाळा स्थानकांवर थांबवण्यात येतील.तसेच याच स्थानकातून लोकल सीएसएमटीच्या दिशेने मार्गस्थ होतील.

शनिवारी दुपारी 2 वाजून 42 मिनिटांनी कसारा येथून सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, काही लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी येथून सकाळी 9.34 ते रात्री 9.32 या वेळेत सुटणाऱ्या सीएसएमटी- कसारा लोकल आसनगावपर्यंत चालवण्यात येतील. सीएसएमटी येथून दुपारी 1.30 वाजता सुटणारी सीएसएमटी – आसनगाव लोकल, सायंकाळी 6.28 वाजता सुटणारी सीएसएमटी- कसारा लोकल, तसेच शनिवारी रात्री सीएसएमटी येथून12.08 वाजता सुटणारी सीएसएमटी -कसारा लोकल टिटवाळा येथेच थांबवण्यात येईल. तर शनिवारी रात्री10.47 वाजता सीएसएमटी कसारा लोकल वासिंद येथेच थांबवण्यात येईल.

हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- कल्याण या मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 दरम्यान ब्लॉक असेल

सीएसएमटीवरून सकाळी 11.16 ते दुपारी4.47 पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा, तसेच सीएसएमटीवरून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 दरम्यान वांद्रे / गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

पनवेल /बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 15.20 पर्यंत सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा, तसेच गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13पर्यंत सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल स्थगित करण्यात आल्या आहेत.

मेगाब्लॉक कालावधीत पनवेल- कुर्लादरम्यान दर 20 मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. सकाळी 10.00 ते सायंकाळी 6 पर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच