Sanjay Raut: संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंददाराआड काय घडलं?; संजय राऊतांनी उघड केली अंदर की बात!!

| Updated on: May 28, 2022 | 1:37 PM

Sanjay Raut: राऊत यांनी आधी थेट मुख्यमंत्र्यांच्या विश्वासहार्यतेवर अविश्वास दाखवता येणार नसल्याचं सांगितलं. राज्यसभेची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची होती. त्यामुळे त्यावर शिवसेनेचाच दावा आहे.

Sanjay Raut: संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंददाराआड काय घडलं?; संजय राऊतांनी उघड केली अंदर की बात!!
संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंददाराआड काय घडलं?; संजय राऊतांनी उघड केली अंदर की बात!!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर: स्वराज्य पक्षाचे संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati)  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यात राज्यसभेच्या जागेवरून काय चर्चा झाली याची माहिती खुद्द संभाजीराजेंनी उघड केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेत प्रवेश करायला सांगितला. मी या प्रस्तावाला तिथेच नकार दिला. महाआघाडी पुरस्कृत उमेदवार करण्याचा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. त्यावर मुख्यमंत्री आपल्याला शिवसेना पुरस्कृत उमेदवार तयार करायला तयार होते. आपणही या प्रस्तावाला तयार होतो, असं सांगतानाच तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून हे सांगायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनीही सांगावं, असं आव्हानच संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यामुळे संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बंददाराआडील चर्चेची काल दिवसभर चर्चा होती. त्यावर आज शिवसेना नेते संजय राऊत  (sanjay raut) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंददाराआड काय झालं हेच संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बंददाराआड नेमकं काय झालं? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतरचा राऊत यांचा हा दौरा असल्याने त्याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचे लक्ष लागले होते. संभाजी छत्रपतींच्या जिल्ह्यात येऊन राऊत काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता लागली होती. राऊत यांनीही आज आपले दिवसभराचे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आधी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे राऊत मोठा खुलासा करणार याची सर्वांनाच कुणकुण लागली होती. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर राऊत यांना संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बंददाराआडील चर्चेबाबत प्रश्न विचारला. संभाजीराजेंनी काय दावा केला याकडेही राऊतांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनीही मोजक्याच शब्दात पण बंददाराआड नेमकं काय झालं याची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

राऊत नेमकं काय म्हणाले?

राऊत यांनी आधी थेट मुख्यमंत्र्यांच्या विश्वासहार्यतेवर अविश्वास दाखवता येणार नसल्याचं सांगितलं. राज्यसभेची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची होती. त्यामुळे त्यावर शिवसेनेचाच दावा आहे. त्यावर इतर कुणीही दावा करू शकत नाही. शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आणि राज्यसभेत शिवसेनेचं बळ एका संख्येने वाढवायचं हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे आम्ही संभाजीराजेंना घातलेली अट योग्यच होती, असं राऊत म्हणाले. तुम्हाला शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायचा की नाही याचा निर्णय मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून घेईल, एवढंच मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं. त्या उपर दुसरं काही घडलं नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी बंददाराआडील चर्चेची दुसरी बाजू दाखवल्याने कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आमच्यासाठी विषय संपला

संभाजी छत्रपतींचा विषय आमच्यासाठी संपला आहे. राजेंनीही काल त्यांचं मन मोकळं केलं आहे. हा 42 मतांचा विषय होता. कुणालाही राजकारणात करिअर करायचं असेल तर कोणत्या तरी पक्षाचा हात धरावा लागतो. महाराणा प्रतापांचे वशंज सुद्धा राजकारणात आहेत. प्रत्येकांचे कुठे तरी राजकीय लागेबांधे आहेत. आम्हीही महाराजांना शिवसेनेत येण्याची विनंती केली. त्यांनी स्वीकारली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.