AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टल मतांमध्ये बाजी मारताच अश्विनी जगताप स्पष्टच बोलल्या, कोणतीही धाकधूक नाही, पण…

चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतदान पार पडल्यानंतर अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बोलत असतांना अश्विनी जगताप यांना लक्ष्मण जगताप यांची आठवण आली होती.

पोस्टल मतांमध्ये बाजी मारताच अश्विनी जगताप स्पष्टच बोलल्या, कोणतीही धाकधूक नाही, पण...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Mar 02, 2023 | 9:23 AM
Share

पुणे : चिंचवड पोटनिवडणूकीत पोस्टल मतदानात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांनी बाजी मारली आहे. पोस्टल मतांमध्ये अश्विनी जगताप यांना चारशे मत मिळाली आहेत. तर सलग दोन फेऱ्यांमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असून महाविकास आघाडीचे नाना काटे यांना पिछाडीवर टाकले आहे. यानंतर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया देत असतांना म्हणाल्या, पोस्टल मतदानात आघाडीवर आहे ही साहेबांनी ( Laxman Jagtap )  केलेल्या कामाची पावती आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढविली आहे. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या च्या माध्यमातून विकास करणार असल्याचे यावेळी अश्विनी जगताप यांनी सांगून टाकलं आहे. दरम्यान निवडणुकीत किंवा विजयाबद्दल कुठलीही दाखधुक वाटत नसून विजय हा निश्चित असल्याचा दावा अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.

पोस्टल मतदानात अश्विनी जगताप यांना 400 मतं मिळाली असून दुसऱ्या फेरी पर्यंतर अश्विनी जगताप यांची आघाडी कायम आहे. पहिल्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहे, नाना काटे यांना 3604 मत तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत मिळाली आहे.

चिंचवड मतदार संघात खरंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकरून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान याच वेळी मागील निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिरंगी लढत ही चिंचवडमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये अश्विनी जगताप या आघाडीवर आहे.

चिंचवड मतदार संघात अश्विनी जगताप यांनी प्रचार करत असतांना लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतं मागितली होती. तर भाजपच्या दिग्गज नेत्यांनी यावेळी प्रचार करत अश्विनी जगताप यांना निवडणूक आणण्यासाठी ताकद लावली होती.

तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी प्रचार करत नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली होती.

मात्र, यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली होती हे स्पष्ट हॉट आहे. त्यामुळे निकाल काय लागतो त्यात कुणाला किती मते मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...