NCP Meeting: दोन्ही राष्ट्रवादीची 2 तास मॅरेथॉन बैठक; विलिनीकरणावर काय चर्चा? नेमकं सांगून जितेंद्र आव्हाडांनी विषयच संपवला!

Jitendra Awhad News: शरद पवारांच्या भेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मोठी माहिती दिली आहे.

NCP Meeting: दोन्ही राष्ट्रवादीची 2 तास मॅरेथॉन बैठक; विलिनीकरणावर काय चर्चा? नेमकं सांगून जितेंद्र आव्हाडांनी विषयच संपवला!
Jitendra Awhad
| Updated on: Nov 07, 2026 | 10:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी दोन्ही गटांतील नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं.

विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत काही चर्चा झाली का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विलीनीकरणाच्या चर्चांचं स्पष्ट शब्दांत खंडन केलं. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. ‘आमच्यामध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही. मला तर त्यात काही रसही नाही. मला त्यामध्ये घेण्यात येणार नसेल, तर अशा चर्चांचा प्रश्नच येत नाही,’ असं आव्हाड म्हणाले.

Loading...

या भेटीमागची पार्श्वभूमी सांगताना आव्हाड म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून अनेक नेत्यांची एकमेकांशी भेट झाली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात आणि कामांमध्ये व्यस्त होता. आपण मात्र शरद पवार यांना भेटत होतो. इतर नेते बाहेर असल्याने सर्वांची एकत्र भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटण्याचं ठरवलं होतं. साहेबांसोबत गप्पा मारण्यासाठी बसलो आणि त्यानंतर वेगवेगळे विषय निघत गेले, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या भेटीत पार्थ पवार यांच्या उपस्थितीबाबतही आव्हाड यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना, ‘त्यांच्या कुटुंबातील लोक कधीही येऊ शकतात आणि जाऊ शकतात,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट आणि दुसरीकडे विलीनीकरणाच्या चर्चांचं आव्हाडांकडून खंडन, यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, बैठकीत विलीनीकरणाचा विषय चर्चेला आला नसल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांना रुग्णालयातून आजच घरी सोडलं आहे.  यानंतर नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us