AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं, शिंदे गटाच्या नेत्याची अजित पवार यांच्यावर जहरी टीका

अजित पवार यांनी जो शपथ विधी केला त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मी पुण्यात बसून त्यांना प्रश्न विचारतो आहे असं शिंदे गटाच्या नेत्याने म्हंटलं आहे.

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं, शिंदे गटाच्या नेत्याची अजित पवार यांच्यावर जहरी टीका
Image Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2023 | 5:02 PM
Share

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : मराठी एक म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून अशी परिस्थिती सध्या अजितदादांची झालेली आहे. तुम्हाला 23-11-2019 सकाळ आठवली असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं अजित दादा सकाळी शपथविधीला गेले तेव्हा दात न घासता गेले होते त्यांना घाई झाली होती. राज्यपालांकडे शपथ विधी करण्याची त्यांना किती घाई झाली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं म्हणतात मग तुम्ही केलं ते काय होतं ? शरद पवार साहेबांना सोडून तो शपथविधी घेतला होता, ती गद्दारी होती का शरद पवार साहेबांच्या विरुद्धचा उठाव होता ? असा साधा प्रश्न मी त्यांना पुण्यात बसून विचारत आहे असं शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

पहाटेच्या वेळी अजित दादा यांनी शपथविधी करत होते तेव्हा शरद पवार साहेबांचा मुलगा स्वतःला म्हणतात त्यांनी आम्हाला फोन केले होते की अजित दादांचे पुतळे जाळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचे पुतळे जाळले असा गंभीर आरोप म्हस्के यांनी केला आहे.

अजित पवार यांनी जो शपथ विधी केला त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मी पुण्यात बसून त्यांना प्रश्न विचारतो आहे असं म्हणत 10 जून 1999 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकसभा अध्यक्षांना स्थापनेचे पत्र दिले होते,

तेव्हा ते लोकं काँग्रेस म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला ही गद्दारी नव्हती का ? शरद पवार साहेबांनी काँग्रेसच्या विरुद्ध केलेली ती गद्दारी केली होती का नाही ? त्याला काय म्हणायचं याचं स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे असेही नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

अजित पवार यांनी म्हटले आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान काय? शिवसेना तयार करण्यामध्ये शिवसेना वाढविण्यामध्ये त्यांचे काय योगदान आहे ? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली त्यांच्या विचारांवर ती शिवसेना वाढली.

त्यामध्ये इतरांचे योगदान नाही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान नाही ते स्वतः अजित दादा कबूल करतात. हे शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी पक्षाने केलेले आहे.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर युती केली आहे. पण ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संपवून टाकलं आहे असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला आहे.

शिंदे साहेबांची कारकीर्द पाहता या लोकांचा रिस्पॉन्स पाहता येईल असे त्यांचे स्वागत करत आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे त्यांच्यावर इलाजाची गरज आहे अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.