दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर आता थेट शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात
Image Credit source: social media
| Updated on: May 31, 2025 | 5:49 PM

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, दरम्यान याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा थेट प्रश्न विचारण्यात आला, याला उत्तर देताना ते मला माहीत नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

दरम्यान दोन्ही पवार एकत्र कधी येणार? या प्रश्नला उत्तर देताना शरद पवार यांनी थेट एकत्र येणार किंवा एकत्र येणार नाही? याबाबत कोणतंही वक्तव्य न करता कधी एकत्र येणार ते मला माहिती नाही असं म्हटलं आहे, त्यामुळे आता शरद पवार यांच्या या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे.  वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आजपर्यंत ही फक्त चर्चा आहे,  वरिष्ठ पातळीवर पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील यांनी याबाबतीत आम्हाला कुठेही काहीही सांगितलेलं नाही, जर आम्हाला काही कळालं तर आम्ही नक्कीच मीडियासमोर येऊन बोलू,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया  

दरम्यान यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  शरद पवार साहेब आणि अजितदादांची बोलणी सुरू आहेत असं म्हणतात. मात्र याबाबत सध्या भाकीत करणं उचित नाही, परंतु काही दिवसांनंतर तुम्हाला याचं चित्र स्पष्ट होईल.  शरद पवार साहेब पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला चाललो असं सांगतात. म्हणून ते जे बोलले मला माहिती नाही याचा अर्थ सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत, फक्त नेमकं कोणत्या वेळेला याचा मुहूर्त ते शोधत आहेत, असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं आहे.