Ladki Bahin Yojana : अक्षय्य तृतीयेलाही पैसे नाहीत… लाडक्या बहिणी पाहतायत एप्रिलच्या हप्त्याची वाट ! आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल कार्यक्रमादरम्या अदिती तटकरे यांनी या संबंधी वक्तव्य केल्याने महिलांचा उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण काल (30 एप्रिल) होता. याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अक्षय्य तृतीया उलटून गेली, आज 1 मे चा दिवस उजाडला तरी महिलांच्या खात्यात पैसे येण्याबाबत काहीच अपडेट समोर आलेली नाही. याचदरम्यान महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना महायुतीची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या 1500 रुपयांसाठी आणखी काही वाट पहावी लागणार असं दिसतंय.
महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीत आश्वासनं दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा सवाल सातत्याने विचारला जातोय पण त्यावर नेत्यांनी, सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. एप्रिल महिन्याचा हप्तादेखील अक्षय्य तृतीयेला महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं होतं, पण अजूनपर्यंत तरी त्याबाबत काहीच अपडेट आलेली नाही. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचं लक्ष सध्या त्या मेसेजकडेच आहे.
आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल कार्यक्रमादरम्या अदिती तटकरे यांनी या संबंधी वक्तव्य केल्याने महिलांचा उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
कार्यक्षेत्र आणखी चांगलं कसं ठेवता येईल याकडे लक्ष महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा , 100 दिवसांचा ऊपक्रम पार पडलाय, यातून एक ऊदिष्ट ठेवण्यात आलं, मार्गदर्शन चांगलं मिळालं. कार्यक्षेत्र आणखी चांगलं कसं ठेवता येईल याकडे लक्ष देत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. हे फक्त पुढचं काम अधिक चांगलं करण्याची प्रेरणा देणारं असेल. हे सगळ्यांचं श्रेय आहे, हा बेंचमार्क आहे, चांगली ऊद्दीष्ट ठेवून काम करू असं त्यांनी नमूद केलं.
नव्या वर्षात पदार्पण करतोय, अनेकांनी बलिदान दिलंय, महाराष्ट्र दिनी का साजरा करतो हे पुढच्या पिढीला समजेल. राज्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, कार्य योग्य आहे, गौरवशाली महाराष्ट्र आहे. जांभोरी मैदानात मराठी अस्मिता दाखवली जाणार, विविध नद्यांचे जल आणि माती आणलीये त्याचं प्रदर्शन इथे केलं जाणार , चार दिवसांचा कार्यक्रम होणार असंही तटकरे यांनी सांगितलं.
पालकमंत्रीपदाच्या निर्णयबाबात काय म्हणाल्या अदिची तटकरे ?
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजूनही निर्णय झालेला नसून महायुतीत धुसफूस कायम आहे. मात्र पालकमंत्री पदाचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या. महायुतीत मंत्री म्हणून काम करणं माझं भाग्य आहे, जेव्हा पद जाहीर व्हायचंच तेव्हा ते होईल, पण आम्ही आमचं काम करतोय, मला नकारात्मक बोलायचं नाहीये असं म्हणत त्यांनी या विषयावर आणखी बोलणं टाळलं.
