मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असतानाच आता राज्यात आणखी एक आंदोलन पेटणार, या नेत्यानं घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आता राज्यात आणखी एक आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असतानाच आता राज्यात आणखी एक आंदोलन पेटणार, या नेत्यानं घेतला मोठा निर्णय
| Updated on: Aug 30, 2025 | 8:53 AM

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, म्हणून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये आले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. मराठा बांधवांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे सरकारची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान एकीकडे मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच आता राज्यात आणखी एका आंदोलनानं वातावरण तापण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे सरकारची दुहेरी कोंडी होऊ शकते.

प्रहारचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी मोठा निर्णय घेतला आहे, आजापासून बच्चू कडू हे राज्यभरात शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा काढणार आहेत. आज वाशिम जिल्ह्यातून या शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रेला शुभारंभ होणार आहे. बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे, ते आपल्या मागणीवर ठाम असून, आता संपूर्ण राज्यात बच्चू कडू सभा घेणार आहेत.

दरम्यान बच्चू कडू 2 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईमध्ये मोठं आंदोलन करणार होते. मात्र आता हे आंदोलन 2 ऑक्टोबर ऐवजी 28 ऑक्टोबरला होणार आहे. कर्जमाफीसाठी सर्व संघटनांना सोबत घेऊन मोट बांधणीचा प्रयत्न बच्चू कडू यांच्याकडून सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी लढलो तर मत मिळत नाहीत, शेतकरी आंदोलनात येत नाहीत, असं एका मोठ्या नेत्याने आम्हाला म्हटलं, पण शेतकऱ्यावर आमचा विश्वास आहे, शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होतील, अशी प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनजागृती म्हणून बच्चू कडू यांची ही यात्रा  निघणार आहे. दरम्यान या आंदोलनामुळे आता सरकारच्या कोंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.