भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; अजितदादा गट ठरला गेमचेंजर, राजकारणात मोठा ट्विस्ट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपनं बाजी पलटवली असून, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांच्या नावानं व्हीप जारी करण्यात आला आहे.

भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; अजितदादा गट ठरला गेमचेंजर, राजकारणात मोठा ट्विस्ट
महायुती
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 6:38 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं पारडं जड झालं होतं. मात्र आता अंबरनाथ विकास आघाडीकडून सर्व नगरसेवकांना व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हीप झुगाराला तर कारवाई करणार, असा थेट इशाराच अजित पवार गटाच्या या चार नगरसेवकांना देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा या निवडणुकीत आता भाजपाचं पारडं जड झालं आहे.

अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अंबरनाथ विकास आघाडीला मतदान करा नाहीतर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांना अंबरनाथ विकास आघाडीचे गटनेते अभिजीत करंजुले यांनी दिला आहे. आज सर्व नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा इशारा दिला आहे, आम्ही सर्व 31 नगरसेवकांना व्हिप जारी केला असून, जर या व्हिप विरोधात कोणी मतदान केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितल्याची माहिती यावेळी करंजुलेकर यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ विकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं, उद्या अंबरनाथ नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे, या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन अंबरनाथ विकास आघाडीच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे , अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 59 नगरसेवक आहेत, काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपचे 14 काँग्रेसचे 12 राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि एक अपक्ष असा 31 जणांचा अंबरनाथ विकास आघाडी या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक गट रजिस्टर करण्यात आला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी या गटातील चार नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा दिला होता, अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, या नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गटाचं पारड जड झालं होतं. मात्र आता या निवडणुकीत नगरसेवकांच्या नावानं व्हीप काढण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.