नीट परीक्षा पेपर फुटीला जबाबदार कोण? आठवलेंची पहिली प्रतिक्रिया, केलं मोठं विधान

वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेचे पेपर फुटले आहेत. यामुळे देशभरात चांगलाच गोंधळ उडाला आहे. नीट परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नीट परीक्षा पेपर फुटीला जबाबदार कोण? आठवलेंची पहिली प्रतिक्रिया, केलं मोठं विधान
ramdas athawale
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 15, 2026 | 7:48 PM

नीट ही वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. परंतु या परीक्षेला पेपर फुटीचं ग्रहण लागलं आहे. नीट परीक्षेचे पेपर लीक झाले आहेत. यामुळे देशभरात चांगलाच गोंधळ उडाला आहे. शेवटी सरकारने नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने काही जणांना अटक देखील केलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान काही धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पेपरफुटीवर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

नीट पेपर फुटीवर आठले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला वाटते की नीट पेपर फुटीसंदर्भात समाजातील काही लोक जबाबदार असतात.  सरकार त्याकडे लक्ष देईल,
त्यांना सरकार कडून शिक्षा केली जाईल. पेपर लीक होणे योग्य नाही, असे होणे चांगलं नाही. अशी प्रतिक्रिया यावर आठवले यांनी दिली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाची बचत करा, पेट्रोल, डिझेल जपून वापरा. एक वर्षभर सोने खरेदी करू नका. खाद्य तेलाचा कमी वापर करा असं आवाहन देशातील जनतेला केलं आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी हे देशाच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवून आहेत. अमेरिका आणि इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यामधील अडचणी वाढल्या आहेत. आमचे सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेलमध्ये मोठी भाववाढ झाली नाही. केंद्र या प्रकरणामध्ये लक्ष घालत आहे. सर्व सामन्यांना त्रास होऊ नये, म्हणून काही निर्णय घेतल्या जात आहेत.  राज्य सरकारला एक्साईज कमी करण्याचा अधिकार आहे, असं यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधानांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद द्या, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं.

 

Follow Us