गौतमी पाटीलला लग्नाची मागणी घालणारा रोहन पाटील आहे तरी कोण?
Gautami Patil Marriage : गौतमी पाटील अल्पवधीतच प्रसिद्ध झाली. यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा होऊ लागली. तिला लग्नासंदर्भातही विचारणा होऊ लागली. आता एका तरुणाने जाहीररित्या तिला पत्र लिहित लग्नाची तयारी दर्शवलीय.

महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : ‘सबसे कातील गौतमी पाटील’ याच वाक्याने आणि गौतमी पाटीलच्या दिलखेच अदानी महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलं आहे. डान्सर गौतमी पाटीलच्या लावणीच्या आणि डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिला लग्नासंदर्भात प्रश्न विचारले जात आहे. अधूनमधून गौतमीच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतात. मध्यंतरी नवरा कसा असावा, यावर ती बोलली होती. त्यानंतर आता एका तरुणाने तिला लग्नाची साद घातली आहे. रोहन गलांडे पाटील याने तिला लग्नाची मागणी केलीय.
कोण आहे रोहन पाटील
आपल्या अदांची भुरळ घालत नजरेच्या इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या, गौतमी पाटीलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेत पुन्हा भर पडली आहे, ती बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाची. रोहनने गौतमीला पत्र लिहीत थेट लग्नाची मागणी घातलीय. रोहन हा शेतकरी पुत्र आहे. त्याची शेती बागायती आहे, सोबत दुग्ध व्यवसाय आहे. बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील तो रहिवाशी आहे.
काय म्हटले आहे रोहनने पत्रात
बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांने गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, मी रोहन गलांडे पाटील. मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी माणूसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तू जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये.
यापूर्वी श्रीकांत गडालेने लिहिले पत्र
शेतकरीपुत्र श्रीकांत गडाले असं आहे. तो बीड याठिकाणी राहतो. श्रीकांत याने फेसबूकवर पत्र पोस्ट केलं आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याने गौतमी पाटीलशी कोणीच लग्न करणार नाही, असे पत्रात म्हटले होते. तुमच्या ठुमक्यावर लाखो जण फिदा होतील, पण लग्न कोणी करणार नाही. आत्मपरीक्षण करा, असा सल्ला श्रीकांतने दिला होता.
