AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकासआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे यांनी काय केली मागणी

देशात दोन राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळाले आहे. हरियाणामध्ये भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळालीये. जम्मू-काश्मीरमध्ये पण भाजपला अपेक्षित यश मिळाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होणार आहे. पण त्याआधी उद्धव ठाकरे यांनी एक मागणी केली आहे.

महाविकासआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे यांनी काय केली मागणी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 08, 2024 | 8:52 PM
Share

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 11 तारखेला जाहीर होणार आहे. त्याआधी पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली आहे. हरियाणात भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानं ठाकरेंनी दबाव टाकला का ?, अशी चर्चा सुरु झाली आहे. हरियाणाचा निकाल भाजपच्या बाजूनं लागला आणि काँग्रेसला जबर धक्का बसला. इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केल्याने काँग्रेस कैचीत सापडली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चेहरा जाहीर करावा, माझा पाठींबा असेल असा पुनवृच्चार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केला. ही मागणी करतानाच, आपलं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नसून पुन्हा येईन वरुन फडणवीसांना टोलाही लगावला. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी वारंवार मागणी वारंवार करत आहेत मात्र काँग्रेस आणि शरद पवारांनीही निवडणुकीच्या निकालानंतरच ठरवणार असल्याचं म्हटलं. आता उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर पुन्हा, हायकमांड निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

11 तारखेला म्हणजे, दसऱ्याच्या एक दिवसाआधी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे…पण त्यासोबतच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. उद्धव ठाकरेंनाच, पुन्हा मुख्यमंत्री करायचंय, हे संजय राऊतांनी याआधीही सांगितलं आहे. मात्र आधीच चेहरा घोषित करण्यास ना शरद पवारांची तयारी आहे, ना काँग्रेसची. त्यामुळे महाविकासआघाडीत या मुद्द्यांवरुन मतभेद पाहायला मिळू शकतात.

दुसरीकडे राज्यात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. कारण हरियाणात भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली आहे. तर जम्मूकाश्मीर मध्ये ही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरात भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हटलं आहे. आज मुंबईत भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. हरियाणा तो अभी झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है असा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?