सचिन घायवळ याला शस्र परवाना देण्यासाठी कदम यांच्यावर कोणाचा दबाव ? सुषमा अंधारे यांचा सवाल

गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्र परवाना दिल्यावरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना विरोधकांनी घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांवर टीका केली आहे.

सचिन घायवळ याला शस्र परवाना देण्यासाठी कदम यांच्यावर कोणाचा दबाव ? सुषमा अंधारे यांचा सवाल
| Updated on: Oct 09, 2025 | 4:00 PM

कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पुण्यातील एका गोळीबार प्रकरणात फरार झाला आहे.त्यातच आता त्याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्र परवाना दिल्याच्या प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप होत असल्याने राज्याचे वातावरण तापले आहे. योगेश कदम यांनी आपण त्याला शस्र परवाना दिला होता त्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल नव्हते असे उत्तर दिले आहे. दरम्यान या प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुणे गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंड निलेश घायवळ हा लंडन पळाल्याचे सांगण्यात येत आहे. निलेश घायवळ याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा काय मिळाला यावरुन विरोधक टीका करत आहेत. आता त्यातच त्याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या मंजूरीनंतर शस्त्र परवाना मिळाल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे.

येथे पोस्ट वाचा –

आता त्यातच शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनेक सवाल केले आहेत. गृहमंत्री योगेश कदम यांना सचिन घायवळ याला पासपोर्ट देण्यासाठी कोणी शिफारस केली होती का ? तुम्ही कोणाच्याही शिफारसीवरुन परवाना देत असाल तर तुम्हाला गुळाचा गणपती म्हणून या पदावर बसवले आहे का? ज्याने शिफारस केली होती त्याचे नाव घेण्याची तुमची हिंमत होत नाही म्हणजे तुम्हाला अजिबात प्रोटेक्शन नाही का ? तुम्हाला सतत भीती वाटतेय का ? तुम्ही त्यांची नावे सुद्धा घेऊ शकत नसाल तर बाळासाहेब यांचे नाव आणि त्याचा वारसा कसा काय सांगताय ? तुम्ही त्याचे नाव घ्या घाबरू नका असे सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत म्हटले आहे. त्या पुढे म्हणतात हा दबाव नेमका कोणाचा होता ? शिंदे गटाचा की अजित पवार गटाचा की आणखी कोणाचा याचा खुलासा योगेश कदम यांनी करावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

येथे पोस्ट पाहा –

कुख्यात गुंड निलेश घायवळ त्याचा भाऊ सचिन घायवळ याला आऊट ऑफ वे जाऊन योगेश कदम यांनी शस्त्र परवाना का दिला ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ साठी योगेश कदम यांनी परिश्रम घेतले आहेत.योगेश कदम हे जर गुंडांना बळ देत असतील हे आम्ही पुराव्यासकट पुढे आणला आहे, मग राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही वाट कशाची बघताय, योगेश कदम यांचा राजीनामा घ्या.स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे जर खऱ्या अर्थाने सुरक्षित पुणे करायचं असेल तर पुण्यातल्या गुंडगिरीला बळ देणाऱ्या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.