AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री म्हणून शरद पवार गट कुणाला प्रोजेक्ट करणार?; शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया काय?

महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला आहे. बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. त्याची माहिती देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. बंदमध्ये सामील होण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं.

मुख्यमंत्री म्हणून शरद पवार गट कुणाला प्रोजेक्ट करणार?; शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया काय?
मुख्यमंत्री म्हणून शरद पवार गट कुणाला प्रोजेक्ट करणार?
| Updated on: Aug 23, 2024 | 2:03 PM
Share

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. काँग्रेसने त्यांच्या पक्षातीला एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं किंवा शरद पवार गटाने त्यांच्या पक्षातील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. कुणीही उमेदवार जाहीर करा, मी पाठिंबा देईन, असा आग्रहच उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जाणार आहे की नाही? याचं उत्तरच पवारांनी दिलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची जी भूमिका घेतली आहे. त्यावर भाष्य केलं. मी माझ्या पक्षापुरतं सीमित बोलतो. आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्रीपदात इंट्रेस्ट नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे. सत्तेत परिवर्तन करून राज्यातील जनतेला उत्तम शासन द्यावं, हा आमचा प्रयत्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मीही स्पर्धेत नाही

आम्ही कोणीही आमच्या पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणार नाही. माझा तर प्रश्नच नाही. आता हा मुद्दा काढण्याचीही गरज नाही. लोकांना आज पर्याय हवाय. त्यावर विचार केला पाहिजे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

प्रत्यक्षात घडेल तेव्हा बघू

काही आमदारांनी तुमच्या भेटीगाठी घेतल्या. ते महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. काय चर्चा झाली? कोणी तुमच्या पक्षात येणार आहे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही लोक भेटतात. त्यांनी काही वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे, पण प्रत्यक्षात घडेल तेव्हा विचार करता येईल. बहुतेक 3 तारखेला मी कागलला जाईल. कागलला एक जाहीर सभा घेण्याचा तिथल्या लोकांचा आग्रह आहे. मी त्याला प्रतिसाद देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

धमकीचं माहीत नाही

यावेळी त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरही त्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारने तीन लोकांची सेक्युरिटी वाढवली आहे. त्यात माझ्यासहीत आरएसएसच्या प्रमुखाचाही समावेश आहे. त्यांच्याकडे काही माहिती आहे. त्याच्या निष्कर्षावर त्यांनी सुरक्षा वाढवली आहे. मी त्यांना कुणाकडून काही धमकी आलीय का वगैरे विचारलं. पण त्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती नव्हती. ते सांगू शकले नाहीत. होम मिनिस्ट्रीची प्रक्रिया त्यांना माहीत नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?