
मुंबई: उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (shivsena) उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यावरून भाजपने (bjp) शिवसेनेला टार्गेट केलेलं असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्य भाजपचीच होते. त्यामुळे त्यांचा विजय होणं स्वाभाविक आहे. पण सर्वात जास्त चिंतेंचा विषय पंजाबचा आहे. भाजप हा प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. तसेच पंजाब हे सीमावर्ती प्रदेशाजवळचं राज्य आहे. तरीही या सीमावर्ती राज्यातील मतदारांनी त्यांना नाकारलं आहे. पंतप्रधानांपासून संरक्षण मंत्र्यांनी पंजाबची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला होता. तुम्ही तरी का हरले? गोवा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड तुमचेच होते. तरीही का हरले? उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि शिवसेनेची जी हार झाली, त्याहीपेक्षा सर्वात वाईट अवस्था तुमची पंजाबमध्ये झाली. पंजाब हे सेन्सेटिव्ह राज्य आहे. तिथे तुमचा पराभव का झाला? त्याबाबत तुम्ही देशाला मार्गदर्शन करावं, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना पंजाबमधील पराभवावरून भाजपला घेरले. भाजपला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होतं. पण अखिलेश यादव यांच्या गेल्यावेळेच्या तुलनेत तीनपट जागा वाढल्या. भाजपच्या विजयात मायावतीचं योगदान आहे. ओवेसींचंही आहे. त्यांना पद्मविभूषण, भारत रत्न द्यावं लागेल. आम्ही खूश आहोत. संसदीय राजकारणात हारजीत होत असते. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजप जिंकला आहे. तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री का हरले? गोव्यात दोन दोन उपमुख्यमंत्री का हरले?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
यावेळी त्यांनी तपास यंत्रणांवरही टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणा चुकीने काम करत आहेत. एकाच पक्षाचे आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावानेच काम करतात या मतावर महाविकास आघाडी ठाम आहे. कोणी काही बोललं तरी आमच्या मतात काही फरक पडणार नाही. हे मी बोलल्यावर दहा मिनिटात आमच्या घरावर धाडी पडल्या तरी मी घाबरत नाही. टाका रेड. शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमूलवर केवळ राजकीय कारणासाठीच हल्ले करत आहात हे थांबवा. तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करतात हे आम्ही सांगतो तो दबाव कसा असू शकतो? सत्य सांगणं हा दबाव आहे का? मग सत्य ऐकण्याची तयारी ठेवा, असा शब्दात राऊत यांनी भाजपला सुनावले.
संबंधित बातम्या:
Russia Ukraine War Live : युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीय नागरिकांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल