Russia Ukraine War Live : अमेरिकेने उचललं कठोर पाऊलं, रशियावर घातली व्यापरबंदी

| Updated on: Mar 11, 2022 | 10:28 PM

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Russia Ukraine War Live : अमेरिकेने उचललं कठोर पाऊलं, रशियावर घातली व्यापरबंदी

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा सोळावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर मिसाईलचा मारा सुरू आहे. यामध्ये युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत बारा लाखांपेक्षा अधिक लोकांनी युक्रेन सोडल्याचे समोर आले आहे. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास एक लाख लोकांना युक्रेनच्या प्रमुख शहरांमधून बाहेर काढण्यात आले असून, सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. यामध्ये काही परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. चौदा मार्चला रशियाकडून युक्रेनमध्ये दुसरा युद्धविराम घेण्यात आला होता.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Mar 2022 09:24 PM (IST)

    अमेरिकेने रशियावर व्यापारबंदी घातली

    युक्रेनबरोबर सुरू असलेल्या रशियाच्या युद्धामुळे अमेरिकेने आधी रशियाकडून तेलाची आणि गॅसची आयात बंद केली होती. आता व्यापरावरही बंदी घेतली आहे.

    The United States will revoke Russia’s ‘permanent normal trade relations’ status: US President Joe Biden pic.twitter.com/JSz8uCfaUm

    — ANI (@ANI) March 11, 2022

  • 11 Mar 2022 06:37 PM (IST)

    रशिया-युक्रेन चर्चेत काही ‘सकारात्मक बदल’: पुतिन

    रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेत काही सकारात्मक बदल झाल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी सांगितले. पुतीन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा दोन आठवडे दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे.

  • 11 Mar 2022 05:17 PM (IST)

    2.5 दशलक्ष लोकांनी युक्रेनमधून पलायन केले: एजन्सी

    इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रंट्सने म्हटले आहे की दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर सुमारे 2.5 दशलक्ष लोकांनी देश सोडला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) चे प्रवक्ते पॉल डिलन यांनी एका संदेशात म्हटले आहे की सरकारकडून मिळालेली संख्या ही अशी आहे ज्यांनी शुक्रवारी सकाळपर्यंत देश सोडला आहे. त्यांनी सांगितले की 1.5 दशलक्षाहून अधिक निर्वासित शेजारच्या पोलंडमध्ये गेले आहेत आणि सुमारे 116,000 निर्वासित इतर देशांचे नागरिक आहेत.

  • 11 Mar 2022 03:27 PM (IST)

    रशियाचा टॉपचा कमांडर ठार

    युक्रेनने रशियन रणगाडे उद्ध्वस्त केले आणि 'टॉप कमांडर कर्नल आंद्रेई झाखारोव्हला ठार केले'.

  • 11 Mar 2022 02:37 PM (IST)

    अमेरिका युक्रेनियन कुटुंबाला आश्रय देईल

    अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी युक्रेनियन महिला आणि तिच्या तीन मुलांना देशात आश्रय घेण्याची परवानगी दिली आहे. बुधवारी, बायडेन प्रशासनाने लादलेल्या व्यापक निर्बंधांनुसार महिलेला अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. 34 वर्षीय महिला आणि तिची 6, 12 आणि 14 वर्षांची तीन मुले सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सॅन दिएगो येथे पोहोचली आहेत.

  • 11 Mar 2022 12:18 PM (IST)

    कॅनडा युक्रेनच्या नागरिकांना आश्रय देणार

    युक्रेनमध्ये युद्धामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे युक्रेनमधून अनेक नागरिक स्थलांतर करत आहेत. अशा स्थलांतरील नागरिकांना कॅनडा आश्रय देणार असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो  यांनी म्हटले आहे. ते पोलंड दौऱ्यावर असताना बोलत होते.

  • 11 Mar 2022 11:49 AM (IST)

    'Disney' रशियामधून आपला व्यवसाय गुंडाळणार

    रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर : 'Disney' मोठा निर्णय घेतला आहे. डिस्नेने रशियामधून आपला व्यवसाय गुंडळण्याची तयारी सुरू केलीये.

  • 11 Mar 2022 11:11 AM (IST)

    रशियाने सैनिकांपेक्षा नागरिकांचीच हत्या अधिक केली; युक्रेनचा दावा

    रशियाने युक्रेनवर लादलेले हे युद्ध दहशतवादी युद्ध आहे. रशियाने युद्धात सैनिक कमी आणि युक्रेनियन नागरिकच जास्त मारले असा दावा युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी केला आहे.

  • 11 Mar 2022 10:11 AM (IST)

    अमेरिकेकडून 13.6 अब्ज डॉलरच्या आपत्कालीन पॅकेजला अंतिम मंजुरी

    अमेरिकेकडून युक्रेन आणि नाटोचे सदस्य असलेल्या देशांसाठी 13.6 अब्ज डॉलरच्या आपत्कालीन पॅकेजला अंतिम मंजुरी

  • 11 Mar 2022 09:06 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीय नागरिकांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या 242 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान आज पोलंडहून दिल्लीत दाखल झाले आहे. ऑपरेश गंगा अंतर्गंत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणले जात आहे.

  • 11 Mar 2022 08:04 AM (IST)

    Russia Ukraine War : आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकतेची आवश्यकता - गुटेरेस

    युक्रेनमधील युद्धामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकाची मदत करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकता आवश्यक आहे. असं संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे.

  • 11 Mar 2022 06:58 AM (IST)

    रशियन आक्रमणकर्त्यांविरुद्ध हिंसक भाषणाला परवानगी देण्यासाठी फेसबुकची नियमांमध्ये शिथिलता

    रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर फेसबुकने रशियाविरोधातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र दुसरीकडे रशियन आक्रमणकर्त्यांविरुद्ध हिंसक भाषणाला परवानगी देण्यासाठी, फेसबुकने आपल्या नियमांमध्ये काही बदल केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.

Published On - Mar 11,2022 6:25 AM

Follow us
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.