Explained: पंढरपुरच्या वारीमुळे सपा नेते अबू आझमी यांना रस्त्यावरचा नमाज का आठवला ? वारीचा इतिहास काय ?
Pandharpur Wari : महाराष्ट्रात पंढरपुरच्या वारी संदर्भात सपाचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझमी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंढरपूरच्या वारीची परंपरा कशी सुरु झाली ती पाहूयात....

महाराष्ट्रात सध्या पंढरपूरच्या वारीवरुन धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक स्थळांचा वापर यावरुन वाद सुरु आहे. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारीचा उल्लेख करुन रस्त्यावरील नमाजचा संबंध जोडून वक्तव्य केल्याने वाद वाढले आहे.
मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा जागेवरुन निवडून आलेले सपाचे आमदार अबू आझमी यांनी या संदर्भात एख वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘मी पुण्यातून येत होतो तर मला लवकर निघण्यास सांगण्यात आले. कारण पंढरपुरच्या वारीमुळे रस्ते बंद केले जात होते. आम्ही ( मुसलमानांनी ) कधी याची तक्रार केलेली नाही. मुसलमान आणि हिंदू धार्मिक सद् भावाने खांद्याला खांदा लावून चालत आहेत.परंतू काही नेते जाणून बुझून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘
सपा आमदाराचा सीएम योगींना सवाल
सपाचे आमदार अबू आझमी यांनी असाही दावा केला की नमाजाच्या वेळी कधी-कधी मशिदीत नमाजींची गर्दी जास्त होते. त्यामुळे मुसलमान रस्त्यावर नमाज पढतात. ज्याला ५ ते १० मिनिटांचा वेळ लागत असतो. परंतू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे म्हणणे असे आहे की जे लोक असे करणार त्यांचे पासपोर्ट आणि ड्रायव्हींग लायसन्स रद्द केले जातील.त्यांनी मुसमानांना कधी हे विचारले नाही ती सण रस्त्यावर का साजरा केला जातो.
CM फडणवीस यांची टीका
अबु आझमी यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखड प्रतिक्रीया दिली आहे. अबु आझमी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशी वक्तव्यं करीत असतात. त्यांना मी उत्तर देऊन महत्व देणार नाही. तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले की अबू आझमी सारख्या नेत्यांमुळे मुस्लीम समुदायाविरोधात तक्रार आहे. पंढरपूरची वारी ही भारतात इस्लामच्या आधी पासूनची परंपरा आहे.यात अनेक मुस्लीम देखील भाग घेत असतात. म्हस्के पुढे म्हणाले की वारकऱ्यांची वारी ही अत्यंत अनुशासन प्रिय प्रक्रीया आहे. आणि श्रद्धाळू रस्त्यांच्या कडेकडेने चालतात. त्यामुळे वाहतूकीला खूपच कमी अडथळा होतो असेही ते म्हणाले.
पंढरपुर वारीचा इतिहास काय ?
पंढरपुरची वारी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरांपैकी एक आहे. ही भगवान विठ्ठल (विष्णुचे अवतार)आणि माता रुक्मिणीच्या प्रति भक्तीचे प्रतिक आहे. ज्यात लाखो वारकरी तहानभूक विसरुन उन्हा पावसात पांढरुंगाचे नाव घेत टाळ मृदंगाच्या सोबतीने प्रवास करतात. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोहचतात. या यात्रेला वारी म्हटले जाते. वारी केवळ धार्मिक सण असून तो सामाजिक एकता, भक्ती आणि सांस्कृतिक वारसाचे जीवंत प्रदर्शन असते. ७०० ते ८०० वर्षांपासून ही परंपरा महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक म्हटले जाते. यास वैष्णवांचा कुंभमेळा म्हटले जाते.
कशी झाली पंढरपुरच्या वारीची सुरुवात?
पंढरपुरच्या वारीची सुरुवात सहाव्या शतकात भक्त पुंडलिक याने केली. ज्यांच्या भक्तीमुळे भगवान विठ्ठलाला पंढरपुरात प्रकट व्हावे लागले असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, पुंडलिक त्यात्या आई-वडिलांची सेवा करण्यात इतके व्यग्र होते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण ( विठ्ठल ) आणि रुक्मिणी त्यांच्या समोर प्रकट झाले, तेव्हा पुंडलिकाने विठ्ठलाला विठेवर उभे राहण्यास सांगितले. कारण आपण पित्याचे पाय दाबण्यात व्यस्त आहोत असे त्यांनी म्हटले. पुंडलिकाची ही सेवा पाहून विठ्ठलाने कमरेवर हात ठेवून त्या विठेवर उभे राहून दर्शन दिले. त्यामुळे पंढरपुरच्या मंदिरातील मुर्ती कमरेवर हात ठेवून विठेवर उभी आहे. जी पुंडलिकाच्या भक्तीचे प्रतीक म्हणून २८ युगे विठ्ठलाची मुर्ती उभी आहे. या कथेने पंढरपुराला वारकरी संप्रदायाचे केंद्र बनवले. आजही ही परंपरा कायम आहे. शेतकऱ्यांना या काळात उसंत असते ते या यात्रेत देहभान विसरुन सामील होतात.
