Eknath Shinde: बिहारमध्ये जे नितीश कुमारांना जमलं ते महाराष्ट्रात शिंदेंना का नाही जमलं?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदावर दावा घट्ट झाला आहे. पण बिहारमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना का नाही जमलं असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. दोन्ही राज्यांमधील परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात.

Eknath Shinde: बिहारमध्ये जे नितीश कुमारांना जमलं ते महाराष्ट्रात शिंदेंना का नाही जमलं?
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 7:20 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजूनही मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी अजूनही भाजपकडून त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतापासून भाजप केवळ काही जागा दूर आहे. तरी महायुतीचा मुख्यमंत्री होईस असं भाजपने आधी पासून सांगितलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी दावा सोडल्यानंतर दिल्लीत तिन्ही नेत्यांची बैठक झाली. शिंदेंचे नेते त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं म्हणून मागणी करत होते. पण भाजपने मुख्यमंत्रीपदावर आपलाच हक्क असल्याचं सांगून टाकलंय. दुसरीकडे अशी चर्चा आहे की, बिहारमध्ये जसं घडलं तसं महाराष्ट्रात शिंदे का करु शकले नाहीत. भाजपने अजूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराचे जाहीर केलेला नाही.

एकनाथ शिंदे मागे पडले?

बिहारमध्ये नितीशकुमार यांनी पोकळी इतकी मोठी ठेवली आहे की ती भरून काढणे भाजपला सोपे नाही. या बाबतीत एकनाथ शिंदे नितीशकुमार यांच्या मागे पडले.  2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकून सत्ता राखलीये. सभागृहात बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र ते फक्त 13 जागांपासून बहुमतापासून दूर आहेत. त्यात अनेक अपक्ष आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजपला एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला नाही तरी अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा आहे. दोन्ही पक्षाने जरी भाजपचा पाठिंबा काढून घेतला तरी भविष्यात भाजपला सत्तेतून खाली ओढणं तेवढं सोपं नाही.

भाजपचा विधिमंडळ नेत्याची अजून घोषणा नाही

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. शिंदेंची आणि अजित पवारांची नेते म्हणून निवड झाली पण भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत पेच आहे. आता अशी ही शक्यता वर्तवली जात आहे की, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवे आहे.

बिहारमध्ये भाजप हा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभेत त्यांचे 80 आमदार आहेत. जेडीयूचे 46 आमदार आहेत. CPI(ML) चे 11 आमदार आहेत. जीतनराम मांझी यांच्या चार जागा कायम आहेत.

बिहारमधील परिस्थिती काय?

243 जागांच्या बिहार विधानसभेत महाआघाडीचे 112 आमदार lj सत्ताधारी एनडीएकडे 131 आमदार आहेत. भाजपचे 80, जेडीयूचे 46, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे 4 आणि एक अपक्ष सुमित सिंग यांच्यासह 131 आमदार आहेत. विरोधी महाआघाडीत एकूण 112 आमदार विरोधी पक्षात आहेत, ज्यात RJD चे 77, काँग्रेसचे 19, CPI(ML) चे 11, CPI चे 2, CPI(M) चे 2 आणि AIMIM चा एक आमदार आहे.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.