Sharad Pawar: शरद पवारने तो पार्टी तोडकर, महाराष्ट्रातल्या राजकीय बंड नाट्यावर वाजपेयींचं ते भाषण का व्हायरल? पहा Video

| Updated on: Jun 24, 2022 | 9:36 PM

महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजतीय उलथापालथीच्यावेळी वाजपेयींचं ते भाषण का व्हायरल होत आहे

Sharad Pawar: शरद पवारने तो पार्टी तोडकर, महाराष्ट्रातल्या राजकीय बंड नाट्यावर वाजपेयींचं ते भाषण का व्हायरल? पहा Video
अटलबिहारी वाजपेयी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) अनैसर्गिक सरकार म्हणून भाजपकडून तर अनेक विरोधकांकडून टीका होत होती. तर हे सरकार पडावं म्हणून भाजपकडून ऑपरेशन लोटस केलं गेलं होतं. त्याच ऑपरेशन लोटसचं हा दुसरा अध्याय आहे असे राज्यातील सुज्ञान जनता म्हणत आहे. याच दरम्यान महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी तर शिवसेनेचा राज्याच्या राजकारणातून संमपण्याचा डाव सुरू असल्याचे उघड होतं आहे. आणि हा डाव आखला आहे तो शिवसेनेच्याच एकनाथ शिंदे यांनी. शिंदे यांनी सेनेतील नाराज आमदार आपल्याबरोबर करत थेट राज्य ओलांडले आणि महाविकास सरकार मधून शिवसेनेबाहेर पडावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासमोर ठेवली. यानंतर ज्यामुळे ठाकरे यांनी तुम्ही परत या आपण बसून बोलून. तुम्हीच माझा राजीनामा राज्यपालांकडे घेऊन जा पण आधी राज्यात परत या सेनेत परत या अशी भावनिक साद घातली होती. ज्यानंतर शिंदेकडून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेना आणि मुख्यमुंत्री यांच्या मुख्यमंत्री पदामुळेच हे रामायण महाभारत घडल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले. राज्यात सत्तेच वारे इकडून तिकडे वाहत असतानाच आता अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) याचं संसदेतील एक भाषण तुफान व्हारल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी माझ्यापक्षाकडे नको असलेली सत्ता चालून आली तरी मी त्याला चिमट्याने सुद्धा हात लवणार नाही असं म्हटलं आहे… ज्यामुळे जनता वाजपेयींना पुन्हा आठवत आहे. तर मग पहा वाजपेयींचं ते भाषण का व्हायरल होत आहे आणि त्यात असं काय आहे?

माझ्यावर आरोप करण्यात आला आहे. आणि हा आरोप माझ्या ह्रदयात घाव घालत आहे. आरोप हा आहे की मी सत्तेचा दुरोपयोग केला मला सत्तेचा लोभ झाला आहे. तर मागील दहा दिवसांत जे काही मी केलं आहे ते फक्त सत्तेच्या हव्यासापोठी केलं. तर काही वेळा आधीच मी सांगितलं होतं की, मी मागील 40 वर्षांपासून या सदनाचा सदस्य आहे. तर तेथे निवडणून येणाऱ्या सदस्यांनी माझं आचरण पाहीलं आहे, माझा व्यवहार पाहिलं आहे. याच्याआधीही मी जनता दलाच्या सरकारमध्ये होतो. पण सत्तेच्या लोभात कधी चुकीचं काम नाही केलं. येथे माझे मित्र शरद पवार बसले आहेत. त्यांनी आपली पार्टी तोडली आणि जस्वंतसिंह यांच्याबरोबर सत्तेत गेले. मात्र आम्ही असे नाही केलं. जस्वंतसिंह आपल्या भाषणात याचा उल्लेख करत होते की शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी पार्टी तोडली. ही बाब वेगळी आहे. मात्र त्यांनी पार्टी तोडली. आम्हाला सहकार्य केलं. पण मी असकाही नाही केलं.

हे सुद्धा वाचा

अनेक वेळा हाच सुर ऐकालया मिळतो की , वाजपेयी हे चांगले आहेत. मात्र त्यांची पार्टी काही ठीक नाही. तर सदनात तेच खर आहे असा सुर उमटताच वाजपेयी म्हणाले होते, मग काय करायचा तुमचा विचार आहे… ज्यावर सदनात एकच हास्य फुललं होतं… त्यानंतर ते म्हणाले होते, मला नाव घ्यायचे नाही. मी शरद यांचे नाव ही घेऊ इच्छित नाही. पण आपली पार्टी तोडून फक्त सत्तेसाठी मी त्यात जाणार नाही. तर तसा विचार देखील करणार नाही. भगवान राम ने कहा था कि मैं मृत्यु से नहीं डरता। अगर डरता हूं तो बदनामी से डरता हूं लोकापवाद से डरता हूं माझ्या 40 वर्षांचा राजकीय प्रवास हा एका उघड्या पुस्तकासारखा आहे. पण जेव्हा देशातील जनतेनच भाजपला सगळ्यात मोठा पक्ष बनवत सदनात पाठवलं आहे… तर मग जनतेच्या आदेशाची अवहेला का करावी….