AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिनाभरापेक्षा अधिक काळ झाला आहे, मात्र पंकजा मुंडे यांनी देशमुख यांच्या कुटुंबाची अजूनही भेट घेतलेली नाही, यामागचं कारण आता समोर आलं आहे.

संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण
| Updated on: Jan 21, 2025 | 6:44 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली.  या घटनेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात आक्रेश मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला तरी पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली नाही, यावरून सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. अखेर आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही, याबाबत स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या विनंतीवरूनच मी मस्साजोगमध्ये गेले नाही.  त्यांनीच मला विनंती केली ताई तुम्ही इथे येऊ नये,  इथलं वातावरण बरोबर नाही. आता त्यांची परवानगी घेऊनच मी तिथे जाणार आहे, असं मी आधीच जाहीर केलं आहे. माझ्या जाण्यापेक्षा न्याय तीथे आधी गेला पाहिजे, त्यांना भेटणं संतोष देशमुख यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त करणं हा माझा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे, त्याचं प्रदर्शन मांडणं योग्य नाही, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पकंजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, व्यक्त होता येत नाही. मात्र पंकजा ताई जे बोलत आहेत, त्याबद्दल त्यांचं आणि वहिणींचं बोलणं झालं होतं असा खुलासा धनंजय देशमुख यांनी केला आहे.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?