निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युगेंद्र पवारांनी दिली मोठी अपडेट

राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यानतंर सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युगेंद्र पवारांनी दिली मोठी अपडेट
Yugendra Pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 5:10 PM

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. दरम्यान आज दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी मोठं विधान केलं आहे.  युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार? 

युगेंद्र पवार सोमेश्वर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता,पत्रकारांशी बोलताना त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आगामी कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर देखील मोठं विधान केलं आहे.

‘साधारण तीन दिवसांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आणि शेड्युल जाहीर झाले आहे. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची आणि सभासदांची भेट घेऊन त्यांच्या इच्छा व भावना समजून घेणे आवश्यक होते. म्हणूनच आज काही प्रमुख सभासदांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधला आणि पुढील वाटचालीबाबत प्राथमिक चर्चा केली,’ असं यावेळी युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपकडून लावली जाणारी ताकद या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार का?  अस प्रश्न देखील त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ही  अगदी सुरुवातीच्या आणि प्राथमिक स्तरावरील चर्चा आहे. ही केवळ पहिलीच बैठक असून, मुख्य कार्यकर्ते व सभासदांची मते जाणून घेण्यात आली आहेत. निवडणुकीला सामोरे कसे जायचे आणि पुढे कशी रणनीती आखायची हे लवकरच ठरवलं जाईल, असं यावेळी युगेद्र पवार यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us