Sugar Price : आता दिवाळीतही साखर महागणार, शेअर्सही सुस्साट झाल्यानंतर दिलासा की खिशाला झळ?

दसरा आणि दिवाळी सणांआधी पुन्हा एकदा साखरेचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर वाढलेले पाहायला मिळाले होते.

Sugar Price : आता दिवाळीतही साखर महागणार, शेअर्सही सुस्साट झाल्यानंतर दिलासा की खिशाला झळ?
Will sugar prices rise further
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 07, 2026 | 9:26 PM

यंदाच्या सणासुदीच्या काळात काहीशी चिंता वाढवाणारी घडामोड समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल २० टक्यांची आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान, साखरेचे दर केवळ भारतातच वाढत नाहीत. तर ते जागतिक स्तरावरही वाढत आहेत. देशांतर्गत बाजाराबद्दल सांगायचं झाल्यास साखरेच्या किंमती १९ महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, साखरेचं कमी उत्पादन यामागील मुख्य कारण मानलं जात आहे. त्यामुळे अनेक भारतीय साखर कंपन्यांच्या शेअरमध्येही चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुन्हा दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळपास ४ ते ९ टक्क्यांची वाढ या शेअर्समध्ये दिसून येत आहे.

Loading...

घटलेलं उत्पादन हे एकमेव कारण साखरेच्या या वाढत्या दरांमागे असल्याचं समोर आलं आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये उस उत्पादक राज्य म्हणून गणली जातात. पण या राज्यांमध्ये यावर्षी उत्पादनच घटलं आहे. अंदाजे २८ ते २९ दशलक्ष टनांचं उत्पादन घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा हा फटका मानला जात आहे.

ग्राहकांच्या खिशाला झळा बसू नयेत म्हणून साखरेच्या अतिरिक्त वापरावर बंधन घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. इथेनॉलच्या उत्पादनासाठी साखरेचा वापरावर बंदी घालण्याची सरकारकडून योजना आखली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे साखरेचा वापर कमी होण्याची शक्यता असून वाढत्या किंमतीही आवाक्यात येऊ शकतात.

गेल्या काही दिवसांमध्ये साखरेच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होतना दिसून येते आहे. ग्राहकांना या दरांचा फटका बसू नये म्हणून सरकार विविध उपाययोजना आखताना दिसून येत आहे. सरकारने साठा मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, आता दसरा, दिवाळीसारखे मह्त्वाचे सण येणार आहेत. त्यामुळे पेढे, मिठाई आणि इतर गोड पदार्थांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे मागणीत वाढ झाली की दरांतही वाढ होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात आता यंदाही दुष्काळ पडला आहे. त्यामुळे यावर्षीही उस उत्पादन घटलं आहे. त्यामुळे आता साखरेचं उत्पादनही घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us