प्रियकराने अपहरण करून प्रेयसीला दरीत ढकललं; कोल्हापुरात तरुणीचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

Kolhapur Crime News: कोल्हापुरात प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना घडली आहे. विवाह ठरल्यानंतर प्रेयसीचं अपहरण करण्यात आले. त्यानंतर दरीत ढकलून हत्या केल्याचे समोर आले आहे.

प्रियकराने अपहरण करून प्रेयसीला दरीत ढकललं; कोल्हापुरात तरुणीचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर
| Updated on: Oct 10, 2026 | 7:10 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह ठरलेल्या प्रेयसीचं अपहरण करून तिला दरीत ढकलल्याची घटना शिवडाव नाईकवाडी परिसरात घडली. या घटनेत तरन्नुम नाईक या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर श्रीपाद वडर याला अटक केली आहे. या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरन्नुम नाईक ही अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होती. तिचा विवाह ठरला होता. मात्र याच दरम्यान प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी श्रीपाद वडर याने तरन्नुमचं अपहरण केलं. त्यानंतर तिला दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. दरीत पडल्याने तरन्नुमचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

Loading...

तरुणीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विवाह ठरल्यानंतर तिच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी श्रीपाद वडर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, घटनेमागील नेमकं कारण, अपहरण कसं करण्यात आलं? याबाबत माहिती समोर आली नाही.

याबाबत चौकशी सुरू आहे. तरुणीला दरीत ढकलण्यामागील परिस्थिती याबाबत अधिक तपशील तपासातून स्पष्ट होणार आहेत. प्रेमप्रकरणातून तरुणीचा जीव गेल्याच्या या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुदरगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कोल्हापुरात गुन्हेगारी वाढत आहेत. यामुळे पोलीस सर्तक झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणांवर पोलीस देखरेख ठेवत आहेत. तरीही अशा घटना समोर येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा सुरक्षितेचा मुद्दा समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us