AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं, काठी अन् रॉडने मारहाण, सोलापूर हादरलं

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, विवाहीत महिलेला तिच्या दोन दिरांनी आणि जावांनी बेदम मारहाण केली आहे, या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं, काठी अन् रॉडने मारहाण, सोलापूर हादरलं
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 23, 2025 | 6:11 PM
Share

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  घरगुती हिंसाचाराचा आणखी एक महिला बळी ठरली आहे. विवाहीत महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे,  दीर आणि जाऊ यांच्याकडून या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून, गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चित्रा सतीश भोसले असं मारहाण झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरच्या टेंभुर्णीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रा सतीश भोसले यांना त्यांचे दीर संतोष भोसले, निलेश भोसले आणि जावा निलीता संतोष भोसले व पूजा निलेश भोसले या चौघांनी मिळून काठी व रॉडने  बेदम मारहाण केली आहे, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर चित्रा भोसले यांना त्यांनी विष पाजण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत,  या मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा देखील फाटल्याचा आरोप चित्रा भोसले यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चित्रा भोसले यांच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

दरम्यान या प्रकरणात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 14 मे रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्यानं आरोपी फरार झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार चित्रा भोसले यांचा विवाह सतीश भोसले यांच्याशी 2007 साली झाला होता. त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला. त्यानंतर 2014 साली कुटुंबीयांविरोधात 498 कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.  मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबीयांनी चित्रा भोसले यांना नांदवण्याची लेखी हमी दिल्यानंतर त्या आपल्या सासरी आल्या होत्या. दरम्यान आता पुन्हा त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे, दीर आणि जाऊ यांच्याविरोधात वाढीव कलम लावून अटक करण्याची मागणी वडील आणि भावाने केली आहे. चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!