Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात, ‘थार’चा चक्काचूर

पैलवान सिकंदर शेखच्या थार गाडीला कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ रत्नागिरी-नागपूर हायवेवर अपघात झाला आहे. गाडीने डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. हायवे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत,

Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात, थारचा चक्काचूर
सिकंदर शेख याच्या थार गाडीचा भीषण अपघात
| Updated on: Jun 10, 2026 | 2:24 PM

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ त्याच्या ‘थार’गाडीचा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर हायवे वर विठ्ठलवाडी येथे कारने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख होता की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हा अपघात इतका भयंकर होता की सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे. हायवे पोलीसांकडून या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळी झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी साडेसहाच्या सुमारा रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सिकंदर शेख याच्या थार गाडीचा अपघात झाला. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ कार अपघातग्रस्त झाली. कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. नियंत्रण सुटल्याने थार कार ही साईड डिव्हायडरला धडकली. मात्र गाडी वेगात असल्याने ही जोरदार धडक बसली की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात सिकंदर शेख बालंबाल बचावले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही,

पोलिसांकडून तपास सुरू

थारच्या अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मुळतचा ते अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.

सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. गेल्या वर्षी सिकंदर शेख वादात सापडला होता. त्याला पंजाबमध्ये अटक झाली होती. सिकंदरला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचा त्याच्या वडिलांनी आरोप केला. मात्र त्यानंतर सिकंदर शेख याने जोरदार कमबॅक करत अनेक मैदानं मारली. त्यानंतर आता त्याच्या गाडीच्या अपघाताची माहिची समोर येत असून चाहत्यांना धक्का बसला आहे.त्याला दुखापत झाली नसावी, त्याची प्रकृती ठीक असावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

Follow Us